Pune Crime News | दारु पिण्याच्या पैशावरून तरुणाचा खून, पुरंदर तालुक्यातील घटना

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दारु पिण्याच्या पैशावरून एका तरुणाला बेदम मारहाण करुन त्याला तलावाच्या पाण्यात फेकून देत खून (Murder) केल्याची घटना पुरंदर तालुक्यात (Purandar Taluka) घडली आहे. अक्षय संजय कुंभारकर (वय-25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune Crime News) ही घटना 30 नोव्हेंबर रोजी पारगाव मेमाणे येथे घडली असून जेजुरी पोलिसांनी (Pune Rural Police) आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सुनील शशिकांत सावंत (रा. सावंत वस्ती, पारगाव मेमाणे, ता. पुरंदर) याच्यावर खुनाचा गुन्हाचा गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. याबाबत अक्षय कुंभारकर याचा भाऊ अजय संजय कुंभारकर याने जेजुरी पोलीस ठाण्यात (Jejuri Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (दि.30) जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील पारगाव मेमाणे येथे दुपारी साडे तीन ते चारच्या दरम्यान घडली. आरोपी सुनील सावंत याने अक्षय कुंभारकर यास
दारू पिण्याच्या पैशाच्या कारणावरून शिवागाळ व हातापायाने मारहाण करून तलावाच्या पाण्यात फेकून दिले.
अक्षय याला गंभीर अवस्थेत दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी सुनील सावंत याला अटक केली आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे (API Manoj Navsare) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यात मराठी पाट्यांसाठी आंदोलन, मनसेच्या पदाधिकारी व कार्य़कर्त्यांवर डेक्कन, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत केला बलात्कार; लष्करातील जवानावर FIR

नवले पुलाजावळ पुन्हा अपघात, कंटेनरची पाच वाहनांना धडक; चार जखमी (Video)

मौजमजेसाठी चोरीच्या दुचाकी विक्री करणारे एजंट कोंढवा पोलिसांकडून गजाआड, 15 दुचाकी जप्त

सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणार्‍या जेम्स व्हिल शापुरजी हौसिंग प्रा.लि. कंपनीला एक लाख रुपयांचा दंड