Pune Crime News | कामाला जात नाही म्हणून काठीने मारुन पत्नीचा केला खुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | काही काम करत नाही, कामाला जात नाही, या कारणावरुन चिडून पतीने काठीने, हाताने व लाथाबुक्क्यांनी पत्नीला मारहाण केली. त्यात पत्नीचा मृत्यु झाला. याप्रकरणी पौड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. परशुराम शांताराम पवार असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. तर, मंदा परशुराम पवार असे मृत्यु पावलेल्या पत्नीचे नाव आहे. ही घटना मुळशी तालुक्यातील डावजे गावात पवार याच्या घरी ७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली. Pune Crime News | murder of wife

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

याप्रकरणी अर्जुन किसन जाधव (वय ३०, रा. जातेडे, पो. मुठा, ता. मुळशी) यांनी पौड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही कातकरी समाजातील आहेत. मंदा या अंगाने अशक्त होत्या. त्यामुळे त्यांच्याकडून काम होत नव्हते. यावरुन त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत. मंदा या ७ जुलै रोजी कामाला गेल्या नाही. यावरुन दोघा पतीपत्नीत जोरदार भांडणे झाली.

त्यात परशुरामने त्याच्या जवळील काठीने मंदाला मारहाण केली. तसेच हाताने व लाथाबुक्कयाने बेदम मारले. मारहाणीमुळे मंदा बेशुद्ध होऊन निपचित पडली. माहिती मिळाल्यावर तिला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिचा मृत्यु झाल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ अधिक तपास करीत आहेत.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : Pune Crime News | murder of wife

हे देखील वाचा

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हाला काही नको’,
तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हला काही नको’,
तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | पोलीसनामाच्या बातमीचा दणका ! अखेर शिरुरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई

EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम