Pune Crime News | कमी रकमेच्या वीजबिलासाठी परस्पर वीजमीटर बदलले, दोन तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | महावितरणचे कर्मचारी (MSEDCL) असल्याची बतावणी करत कमी वीज बिलाचे आमिष दाखवून ग्राहकांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) व महावितरणचे वीजमीटर परस्पर बदलल्याप्रकरणी दोघांविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात (Manchar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत माहिती अशी की, आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरातील मार्केट यार्डजवळ ढोबीमळा येथे अंबिका चंदर चव्हाण यांच्या नावे महावितरणने वीजजोडणी दिली आहे. तथापि मीटर रीडिंगच्या पर्यवेक्षणात ग्राहक क्रमांक व महावितरणकडून लावण्यात आलेला मीटर क्रमांक जुळत नसल्याचे संगणकीय प्रणालीतून दिसून आले. त्यानंतर मंचर शाखेचे सहायक अभियंता संजय बारहाते (Assistant Engineer Sanjay Barhate) व सहकाऱ्यांनी वीजग्राहक चव्हाण यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष तपासणी केली. यामध्ये महावितरणकडून लावण्यात आलेल्या वीज मीटर ऐवजी दुसऱ्याच कंपनीचा वीजमीटर लावलेला आढळून आला. (Pune Crime News)

यासंदर्भात वीज वापरकर्ते चंदर धरम चव्हाण यांच्याकडे विचारणा करण्यात आली. यात गणेश महादेव इंदोरे (रा. चांडोली, ता. आंबेगाव) व प्रवीण पाचपुते (जारकरवाडी, ता. आंबेगाव) या दोघांनी दोन महिन्यांपूर्वी घरी येऊन महावितरणचे कर्मचारी असल्याचे सांगितले. वीजबिल दरमहा कमी येईल असे आमिष दाखवून वीजमीटर (Electricity Meter) बदलण्यासाठी 7 हजार 500 रुपये घेतले. त्यानंतर जुना वीजमीटर घेऊन गेले व दुसरा मीटर बसविला, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

तथापि गणेश इंदोरे व प्रवीण पाचपुते दोघेही तोतया कर्मचारी असल्याचे लगेचच स्पष्ट झाले. या दोघांनी कर्मचारी असल्याची बतावणी करून चव्हाण यांच्याकडील अधिकृत वीजमीटरची विल्हेवाट लावली व त्याठिकाणी दुसरे मीटर बसवले. महावितरणसह वीजग्राहकाची फसवणूक केल्याचे आढळून आले. त्यानुसार मंचर पोलीस ठाण्यात महावितरणकडून तक्रार दाखल करण्यात आली. पोलीसांनी या दोघांविरुद्ध कलम १७०, ४२०, ४२७, १३६ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

तोतया कर्मचाऱ्यांपासून सावधान

मीटरमधील वीज वापर कमी दाखवणे, मीटरची गती संथ करण्यासाठी मीटरमध्ये फेरफार करणे, परस्पर वीजमीटर
बदलणे किंवा वीजबिलाची रक्कम कमी करून देण्याचे आमिष दाखविणे आदींसाठी कोणत्याही व्यक्तीने वीजग्राहकांकडे
आर्थिक मागणी केल्यास त्यास कोणताही प्रतिसाद देऊ नये. याबाबत महावितरणच्या संबंधित कार्यालयामध्ये
तात्काळ कळवावे किंवा तक्रार करावी असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार
(Chief Engineer Rajendra Pawar) यांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Sharad Pawar | अजित पवारांनी सांगितला पक्षफुटीचा पडद्यामागील घटनाक्रम, शरद पवारांवर केला ‘हा’ आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड शहरात बनावट ‘पॅराशूट’ तेलाची विक्री, व्यवसायिकावर गुन्हा

Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा लढवण्याची अजित पवारांची घोषणा, आव्हानानंतर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया