Pune Crime News | ‘माझा भाऊ कलेक्टर आहे, तुमची नोकरी घालवतो’, पोलिसांसोबत वाद घालणाऱ्या आरोपींना उच्च न्यायालयाचा दणका

0
633
Pune Crime News | 'My brother is a collector, taking your job', High Court slaps the accused who argued with the police
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | श्री क्षेत्र भीमाशंकर (Shri Kshetra Bhimashankar) येथे गाडी पार्किंग करण्यावरुन झालेल्या वादातून दोन जणांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी (Pre-Arrest Bail) उच्च न्यायालयात (Bombay High Court) अर्ज केला होता. न्यायालयाने आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी एक लाख रुपये पोलीस कल्याण निधीमध्ये (Police Welfare Fund) भरण्याचे (Pune Crime News) आदेश दिले आहेत.

 

राम दत्तात्रय पोळेकर (Ram Dattatray Polekar), दत्ता ज्ञानोबा मारणे Datta Gyanoba Marne (दोघे रा. मुळशी खु. ता. मुळशी जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहे. हा प्रकार भिमाशंकर येथे श्रावण यात्रेदरम्यान घडला होता. याप्रकरणी आरोपींवर पुणे ग्रामीण पोलीस दलातील (Pune Rural Police) घोडेगाव पोलीस ठाण्यात (Ghodegaon Police Station) आयपीसी 353, 341, 332, 504, 506 नुसार 16 ऑगस्ट 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune Crime News)

श्री क्षेत्र भिमाशंकर येथे श्रावण महिन्यात यात्रा भरते. या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. तसेच रस्ता अरुंद असल्याने वाहने रोडवर पार्क (Vehicles Parking) होऊ नयेत यासाठी वाहन पार्किंगसाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. घटनेच्या दिवशी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अंमलदार यांनी आरोपींना वाहन पार्किंगमध्ये लावण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने पोलीस अंमलदार यांना धमकी (Threat) देऊन शिवीगाळ केली. तसेच धक्काबुक्की करुन ‘माझा भाऊ कलेक्टर आहे, आम्ही वाहन पार्किंगमध्ये लावणार नाही’ असे सांगत, ‘तुमची नोकरी घालवतो, तुमच्याकडे बघून घेतो’ असे म्हणत गाडी रस्त्यावर लावली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली.

 

याप्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज (PSI Kishore Vagaj) हे करीत होते.
दरम्यान, आरोपींनी गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस आरोपींचा शोध घेत होते. मात्र ते पोलिसांना सापडत नव्हते.
आरोपींनी केलेल्या अर्जावर मंगळवारी (दि.7) सुनावणी झाली.
न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासाच्या कागदपत्रांचे अवलोकन करुन आरोपींना अटकपूर्व जामीन
मंजुर करण्याकरीता एक लाख रुपये पोलीस कल्याण निधीमध्ये भरण्याचे आदेश दिले.

 

Web Title :- Pune Crime News | ‘My brother is a collector, taking your job’, High Court slaps the accused who argued with the police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mundhwa Premier League Cricket Tournament |‘मुंढवा प्रिमिअर लीग’ क्रिकेट स्पर्धा ! महाराणा रॉयल्स् संघाला विजेतेपद

Ahmednagar ACB Trap | 10 हजार रुपये लाच घेताना महिला वैद्यकीय अधिकारी ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Devendra Fadnavis | देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस