Pune Crime News | नारायण पेठ : क्लिनिकमध्ये बकार्डी पाजून 20 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार; डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणीला क्लिनिकमध्ये बोलावून तिला दारु पाजून तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

डॉ. शुभंकर महापुरे Dr. Shubhankar Mahapure (वय २६, रा. विजया अलंकार सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) असे त्याचे नाव आहे.

याबाबत एका २० वर्षाच्या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१२/२३) दिली आहे. हा प्रकार नारायण पेठेतील डॉ. महापुरे याच्या क्लिनिकमध्ये शनिवारी रात्री पावणे दहा वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी डॉ. शुभंकर महापूरे यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती.
त्यांची ओळख वाढत गेली. डॉक्टराने तिला आपल्या क्लिनिकमध्ये जेवण करायला रात्री बोलावले होते.
तेथे तिला बकार्डी नावाची रम (Bacardi Rum) पाजली. त्यामुळे तिला गुंगी आली.
त्याचा गैरफायदा घेऊन त्याने तिच्यावर बलात्कार (Pune Rape Case) केला. हा प्रकार लक्षात आल्यावर तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक साळुंखे (PSI Salunkhe) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Belly Fat Loss | पोटाची चरबी कमी करायची असेल, तर डाएटमध्ये समाविष्ट करा ‘हे’ ड्रिंक्स

Back Pain चा किडनीशी आहे जवळचा संबंध, जाणून घ्या – पाठीत कुठे वेदना असतील तर असू शकतो मोठा आजार