Pune Crime News | नारायणगाव पोलिस स्टेशन – एकाच तरुणीच अनेकांशी विवाह लावून लाखो रुपयांना लुबाडले

पुणे : Pune Crime News | लग्न न जमणार्‍या तरुणांना हेरुन त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून लग्नानंतर तरुणीला घेऊन जाऊन फसवणूक (Cheating Case) करण्याचा प्रकार नारायणगावात समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी एका ३३ वर्षाच्या तरुणाने नारायणगाव पोलीस ठाण्यात (Narayangaon Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मीरा बन्सी विसलकर Meera Bansi Visalkar (रा. घोटी, भाडे, नाशिक), बाळु गुलाब सरवदे Balu Gulab Sarvade (रा. गुंजाळवाडी, आर्वी, नारायणगाव), शिवाजी कुरकुटे (रा. बोटा कुरकुटवाडी, संगमनेर) यांच्यावर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाजीपाल्याचा व्यापार आहे. त्यांना गावातील बाळु सरवदे यांनी तुझ्यासाठी मुलगी पाहिली आहे, असे सांगून मीरा विसलकर हिचा नंबर दिला. मीरा यांच्याशी बोलणे झाल्यावर त्यांनी एका तरुणीचा फोटो पाठविला. तिच्या आधार कार्डावर संध्या विलास बदादे Sandhya Vilas Badade (वय २३, रा. विठ्ठलनगर, पो. निळवंडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) असे होते. त्यानंतर १० मे २०२३ रोजी लग्न करायचे ठरले. मीरा हिने मुलीची परिस्थिती हालाखीची आहे. तिला वडिल, बहिण, भाऊ नसून आई आजारी असते. तिला १ लाख ३० हजार रुपये हवे आहेत, असे मध्यस्थी करणार्‍या मीरा व बाळु सरवदे यांनी सांगितले. त्यानुर जुन्नरमधील शिवपार्वती विवाह सोहळा केंद्रात वैदिक पद्धतीने लग्न केले. लग्नाला मुलगी, तिची आई व ५ ते ६ जणांना घेऊन आली होती. (Pune Crime News)

त्यानंतर जुन्नर कोर्टामध्ये (Junnar Court) नोंदणी करण्यासाठी गेले.
मात्र, कागदपत्रात त्रुटी असल्याने लग्नाची नोंदणी होऊ शकली नाही. तेव्हा परिसरातील वकिलाकडे नोटरी करुन घेतली.
त्यानंतर ठरल्याप्रमाणे फिर्यादी यांनी १ लाख ३० हजार रुपये दिले.
मीरा हिने त्यातील काही रक्कम बाळु सरवदे याला दिली. संध्या ही फिर्यादी यांच्या घरी आले.
ती वारंवार फोन मीरा हिला करत होती. १७ मे रोजी मीरा विसलकर ही संध्या हिला घेऊन गेली.
त्यानंतर फिर्यादी यांनी पत्नी परत कधी येणार असे विचारल्यावर तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर तिने संध्या कोठेतरी पळून गेली आहे, असे सांगितले.

त्यानंतर संध्या बदादे म्हणून जिचे फिर्यादी यांच्याशी लग्न लावून दिले.
तिचे याअगोदर एका तरुणाबरोबर २३ मार्च रोजी आळंदीतील इंद्रायणी मंगल कार्यालयात दुसर्‍याशी लग्न लावून दिले होते.
दोन्ही लग्नातील मुलगी एकच होती.
तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advt.

Web Title :  Pune Crime News | Narayangaon Police Station – A single young woman was robbed of lakhs of rupees by marrying many people

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर…’, राष्ट्रवादीच्या आमदाराचा नितेश राणेंवर ‘प्रहार’

Maharashtra IAS Officer Transfer | राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या, वाचा संपुर्ण यादी

Pune Crime News | 10 टक्के व्याजाने घेतलेले पैसे परत केल्यानंतर देखील पैशासाठी तगादा लावणार्‍या सूरज म्हेत्रेविरूध्द खंडणीचा गुन्हा