Pune Crime News | जेवणावर मोफत सुप दिल्याने शेजारच्या हॉटेलचालकांनी केली मारहाण

0
324
Pune Crime News | Neighboring hoteliers beat up them for giving free soup on food
file photo

पुणे : Pune Crime News | आपल्याकडील ग्राहक वाढविण्यासाठी एका हॉटेलचालकाने जेवणावर मोफत सूप देण्याची योजना सुरु केली. त्यामुळे त्याचे ग्राहक वाढल्याचा राग मनात धरुन दुसर्‍या हॉटेलचालकांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने मारहाण (Beating) केल्याचा प्रकार खडकीत समोर आला आहे.

याप्रकरणी मुलायम रामकृपाल पाल (वय २७, रा. खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५०/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सिद्धार्थ भालेराव आणि दिग्वीजय गजरे (रा. खडकी) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार खडकीमधील चौपाटी येथील मेवाड पावभाजी सेंटरसमोर सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाल यांचे ओ शेट नावाचे हॉटेल आहे.
तर आरोपींचे साहेब नावाचे हॉटेल आहे. फिर्यादी यांनी त्यांचे ग्राहक वाढावे, यासाठी जेवणाअगोदर मोफत सूप देण्याची योजना चालू केली. त्यामुळे फिर्यादी यांचे ग्राहक वाढले. त्याचा राग मनात धरुन आरोपी चौपाटी येथे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जखमी केले. येथे धंदा का करता असे म्हणून शिवीगाळ केली. खडकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Neighboring hoteliers beat up them for giving free soup on food

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Bypoll Election | एवढीच ताकद होती तर टिळक, घाटे, बापट यांना निवडून आणण्यात काय अडचण होती ?

Pune Crime News | कोरोना, लॉकडाऊनपासून बंद पडलेल्या पण आता सुरू झालेल्या ‘एमओबी’मध्ये 20 गुन्हेगारांची ‘परेड’

Repo Rate Hiked | आरबीआयचा सर्वसामान्यांना पुन्हा झटका, रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ; तुमचा EMI कितीने वाढणार? जाणून घ्या