Pune Crime News | भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यावरुन उच्चभ्रु सोसायटीतील शेजारी पोहचले पोलीस ठाण्यात; महिलेने दिली विनयभंगाची तक्रार

पुणे : Pune Crime News | भटक्या कुत्र्यांना, रस्त्यावरील कुत्र्यांना खाऊ घालून परिसरात घाण केली जात असल्याने एका उच्चभ्रू सोसायटीत राहणारे शेजारी शेजारी एकमेकांना भिडले. त्यांचे भांडण चक्क पोलीस ठाण्यात पोहचले. यातील महिलेने आपला विनयभंग (Molestation) केल्याची फिर्याद दिली आहे. ही घटना फुरसुंगीतील पार्क इन्फिनिया (Park Infinia, Fursungi) या सोसायटीत घडली आहे. हा प्रकार १५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत एका ४३ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १११/२३) दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी एकाच सोसायटीमध्ये राहतात.
फिर्यादी या सोसायटीमधील भटक्या कुत्र्यांना खायला देत होत्या.
त्यावर आरोपी व त्याची पत्नी फिर्यादी यांना रस्त्यावरील कुत्र्यांना जेवण घालण्याबाबत जाब विचारला.
त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांचे मोबाईलमध्ये शुटिंग करु लागल्या.
तेव्हा आरोपीने त्यांचा मोबाईल हिसकावुन घेण्याचा प्रयत्न करत अंगावर येऊन त्यांना धक्का देऊन त्यांच्या
मनास लज्जा उत्पन्न केल्याने गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

माणसांमाणसांमधील प्रेमापेक्षा अनेकांना प्राणी प्रेम अधिक महत्वाचे वाटू लागले आहे.
त्यातून भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खायला घालून तेथे घाण केली जाते.
पाळीव कुत्र्यांनी घरात घाण करु नये, म्हणून त्यांना बाहेर फिरायला घेऊन जात रस्त्यावर घाण केली जाते.
त्यावरुन शहराच्या सर्वच भागात कुत्र्यांवरुन भांडणे होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Neighbors in elite society reach police station for feeding stray dogs; The woman filed a molestation complaint

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Davos World Economic Forum 2023 | दावोस जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार; एक लाखांहून अधिक रोजगार निर्मिती

Pune District Planning Committee | पुणे जिल्हा नियोजन समितीवर सदस्य नियुक्त; 20 जणांचा समावेश

Sanjay Raut | ‘फडणवीस बदला घेतात की नाही, हे मी सांगू शकत नाही,’ संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सूचक विधान

Nashik Crime | नाशिक पुन्हा हादरलं! जुन्या भांडणातून तरुणाचा निर्घृण खून, 24 तासात दोन घटना