Pune Crime News | पोलीसच काय त्यांची घरेही नाही सुरक्षित; पोलीस लाईनमध्ये शिरुन चोरट्याच्या घरफोड्या

पुणे : Pune Crime News | पोलिसांना शिवीगाळ करणे, मारहाण करण्याचे प्रकार सध्या अनेकदा भर दिवसा रस्त्यावर होताना दिसतात. त्यात आता पोलीस लाईनमध्ये असलेली त्यांची घरेही सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे.
विश्रांतवाडी पोलीस लाईन (Vishrantwadi Police Quarters) शिरुन एका मुलाने दोन पोलिसांची घरे फोडली.
याप्रकरणी गजानन चव्हाण यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २०१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका २० वर्षाच्या चोरट्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
हा प्रकार विश्रांतवाडी पोलीस लाईन इमारत नं. बी. ५ मध्ये १९ मार्च रोजी पहाटे ३ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण हे त्यांच्या मुळ गावी जालना येथे गेले होते.
चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
घरातील २७ हजार रुपयांचे २ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले.
तसेच स्वामी राठोड यांचे घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरातील चांदीचे पैंजण,
रोख रक्कम असा १५ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Not even the police, their houses are safe; Burglary by burglars by entering the police line
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | रूम भाड्याने देताय सावधान; डिपॉझिट पाठविण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक