PMPML मधील चोर्‍या सुरूच, नागरिक ‘हैराण-परेशान’ तर पोलिस ‘हतबल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेत टोळ्या महिलांना लक्ष करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने चोरून नेत आहेत. काही केल्या या घटना थांबत नसताना पोलीसांना मात्र त्या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात हेच सुचेनासे झाले आहे. आम्ही चोरट्यांचा माग काढतोय इतकेच सांगावे लागत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.

याप्रकरणी एका पिसोळी परिसरात राहणार्‍या 54 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका खासगी कंपनीत कामाला आहेत. कामानिमित्त त्या दोन दिवसांपुर्वी (दि. 6) सकाळी नऊच्या सुमारास हडपसर -कात्रज बसने प्रवास करीत होत्या. त्यावेळी बसमध्ये गर्दी होती. चोरट्यांनी हाच फायदा घेतला. तसेच, त्यांच्या हातातील 50 हजारांची सोन्याची बांगडी चोरली. महिला बसमधून पिसोळी परिसरात उतरत असताना त्यांना हातातील सोन्याच्या बांगडीची चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिंदे अधिक तपास करीत आहेत.

एका आठवड्यात तीन घटना…
शहरात पीएमपीएलमध्ये चोर्‍या करणार्‍या टोळ्यांनी हैदोस घातला आहे. गेल्या काही महिन्यात पन्नासहून अधिक घटना घडल्या आहेत. महिलांना लक्ष केले जात आहे. त्यातही सकाळी आणि संध्याकाळीच या टोळ्या सक्रिय असतात. त्यातही त्याच-त्याच भागात या टोळ्या गुन्हे करत आहेत. मात्र, तरीही पोलिसांना ते सापडत नसल्याचे वास्तव पाहिला मिळत आहे. आम्ही साध्या वेशातील पोलीस लावलेत, त्यांचा माग काढण्यात येत आहे, असेच पोलीस सांगत आहेत.

सायबर चोरट्यांचा महिलेला 47 हजारांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बँक खात्याची केवायसी अपुर्ण असल्याची बतावणीकरून डेबिट कार्डची माहिती घेऊन सायबर चोरट्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून महिलेला 47 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बालेवाडी परिसरात राहण्यास आहेत. फिर्यादी या एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. त्यांना अज्ञात क्रमांकावरून फोन आला. तसेच, पेटीएम ऑफिसमधून बोलत असल्याची बतावणी केली. तुमच्या पेटीएम खात्याची केवायसी अपुर्ण असून ती पुर्ण करावी लागेल असे सांगितले.

त्यानुसार त्याने महिलेकडील डेबीट कार्डची गोपनीय माहिती विचारुन घेतली. त्यानंतर ऑनलाईन त्यांच्या खात्यावरून 47 हजार रुपये काढून फसवणूक केली. अधिक तपास चतु:श्रृंगी पोलीस करत आहेत.

बोपोडीत सहा रिक्षांची तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच असून खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोळक्याने पार्किंग केलेल्या रिक्षांची तोडफोडकरून दहशत माजवली आहे. दरम्यान, या वाहन तोडफोडीला अतिवरिष्ठ अधिकारीच गांभिर्याने घेत नसल्याचे पाहिला मिळत आहे. याप्रकरणी राजू शेख (वय 30, रा. बोपोडी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू रिक्षाचालक आहेत. ते बोपोडी परिसरात राहण्यास आहेत. त्यांनी येथील रेल्वे गेटजवळ त्यांची रिक्षा पार्क केली होती. त्याठिकाणी इतरही रिक्षा पार्क करण्यात आलेले होते. त्यावेळी अज्ञाताने शेख यांच्या रिक्षासह इतर पाच रिक्षांच्या काचांची तोडफोड करुन नुकसान केले. तर टेम्पोतील बॅटरी, टेप असा 14 हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पुुरुषोत्तम देवकर अधिक तपास करीत आहेत.

कमिन्स इंडिया कंपनीतील 43 लाखांचे स्पेअरपार्ट चोरीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध अशा कमिन्स इंडिया लिमीटेड कंपनीतून तब्बल 43 लाख रुपयांचे स्पेअरपार्ट चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, काम करणार्‍या कर्मचार्‍यांनीच हे पार्ट चोरले आहेत.

एप्रिल ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी धीरज कोल्हे (वय 46, रा. सनसिटी, सिंहगड रस्ता) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सिलेंडर हेड विभागात नियमीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड येथील डहाणूकर कॉलनीत कमिन्स इंडिया लिमीटेड ही प्रसिद्ध कंपनी आहे. त्याठिकाणी विविध कंपनीसाठी लागणारे वेगवेगळे पार्ट तयार करुन दिले जातात. फिर्यादी हे याठिकाणी नोकरीस आहेत. दरम्यान, सिलेंडर विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी व्हॉल्वसिट इन्सर्ट नावो कंपनीचे 43 लाख 47 हजार रुपये किंमतीचे स्पेटरपार्ट चोरुन नेले. पार्ट चोरीला गेल्यानंतर हा प्रकार वरिष्ठांना सांगण्यात आला. त्यांनी माहिती घेऊन पोलीसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी कोथरुड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/