कोयत्याच्या धाकाने देशी दारू विक्रेत्याला लुटलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कडेकोट संचारबंदीत शहरात थांबलेली गुन्हेगारी आता पुन्हा सुरू झाली असून बिबवेवाडीत दोन दुचाकीवर आलेल्या दरोडेखोरानी कोयत्याचा धाक दाखवत देशी दारू दुकानदाराजवळील रोकड लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी सुहास निगडे (वय ४२, रा. कोंढवा बुदू्रक) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सहा जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास यांचे देशी दारूचे दुकान आहे. बिबवेवाडीत त्यांचे दुकान आहे. रविवारी सायंकाळी दुकान बंद केल्यानंतर त्यांनी गल्ल्यातील ५० हजारांची रोकड एकत्रित केली. त्यानंतर ते दुचाकीवर संदेशकुमारसोबत घराकडे चालले होते. त्यावेळी अत्तार सप्लायर्स इमारतीसमोर पाठीमागून दोन दुचाकीवर आलेल्या सहाजणांच्या टोळक्याने त्यांना अडविले.

तसेच कोयत्याचा धाक दाखवून ५० हजारांची रोकड हिसकावून घेतली. त्याच्या खिशातील २० हजारांचा मोबाईल देखील पळविला. या घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपींचा सुरू केला. लवकरच चोरट्यांना जेरबंद करण्यात यश येईल असे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी दिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like