Pune : मद्यपी पतीकडून पत्नीला मारहाण, बायकोचे दात पडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मद्यपी पतीने मटण बनवायला उशीर झाल्याच्या कारणावरून पत्नीला मारहाण तर केलीच पण तिचे दात पडल्याची घटना घडली आहे. पुण्यातील औंधगावात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी प्रभाकरन नाडार (वय ४५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पत्नी कविता नाडार (वय ४०) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता व प्रभाकरन पती-पत्नी असून ते औंधगावात राहायला आहेत. दोन दिवसांपुर्वी प्रभाकरन दारु पिउन घरी मटण घेउन आला होता. त्याने पत्नी कविता याना मटण बनवून देण्यास सांगितले. मात्र, पत्नीने दीड तासानंतर मटण बनवून देते असे पती प्रभाकरनला सांगितले. त्याचा राग पती प्रभाकरन याला आला. यामुळे त्याने कविता याना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तर तोंडावर एक ठोसा मारला. त्यामुळे कविता यांचे दात पडून दुखापत झाली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार काटम करीत आहेत.