Pune : शतपावलीस आलेल्या जेष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकाविले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घराशेजारी शतपावली करणाऱ्या एका जेष्ठ महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेले. कायम वर्दळीचा परिसर असणाऱ्या एरंडवना येथे सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी महिलेने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातचोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला या भरत कुंज शतपावली करीत होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील ७० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला, मात्र, तोपर्यंत चोरटा पसार झाला. अधिक तपास उपनिरीक्षक सूरज गोरे करीत आहेत.