‘ब्रेकफास्ट’ला झाला उशिर, पती-पत्नीमध्ये जुंपली अन् मेव्हण्याचं फुटलं डोकं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सकाळचा नाष्टा देण्यास उशीर झाल्याने पती-पत्नीत कडाक्याचे झालेले भांडण सोडविण्यास गेलेल्या मेव्हण्याचेच पतीने डोके फोडून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. केवळ नाष्टा उशीरा दिल्याने हा प्रकार घडल्याने पोलीसांनीही डोक्याला हात लावला आहे.

किरण प्यारेलाल (वय 27) असे या घटनेत जखमी झालेल्या मेव्हण्याचे नाव आहे. याप्रकरणी राहुल पोखरम (वय 46) याच्यावर भादवी कलम 324, 325, 504 तसेच 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किरण यांच्या बहिणीने पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल व फिर्यादींचा काही वर्षांपुर्वी विवाह झालेला आहे. राहुल हे सध्या काही काम धंदा करत नाहीत. दरम्यान, तीन दिवसांपुर्वी राहुल यांनी सकाळी उठल्यानंतर नाष्टा मागितला. परंतु, नाष्टा देण्यास उशीर झाला. यावरून दोघांत वाद झाले. त्यामुळे मेव्हणा किरण हा त्यांचे वाद सोडविण्यासाठी आला. त्याने वाद सोडविला. याचा राग आल्याने राहुल याने किरण यांच्या डोक्यात काचेची बाटली मारली. यात किरण हे रक्तबंबाळ झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. फिर्यादींनी तक्रार दिल्यानंतर राहुल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप राहूल याला अटक करण्यात आलेली नाही. अधिक तपास उपनिरीक्षक गिरी हे करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/