Pune Crime News | पुण्याचे माजी महापौर आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बिल्डरकडे 3 कोटींच्या खंडणीची मागणी; जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश सरचिटणीस व माजी महापौर (Pune Foremer Mayor) मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या नावाने एका बांधकाम व्यावसायिकाकडे (Builder In Pune) ३ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात (Extortion Case) आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police Station) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

संदीप पिरगोंडा पाटील Sandeep Pirgonda Patil आणि शेखर गजानन ताकवणे Shekhar Gajanan Takwane (वय ३५, रा. भालेकर चाळ, कर्वे रस्ता – Karve Raod Pune) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

 

याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २५ मार्च रोजी दुपारी १२ ते सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या दरम्यान घडला.

या प्रकरणी आरोपी पाटील, ताकवणे यांच्या विरुद्ध खंडणी (Ransom), धमकावणे, माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये (IT Act) गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पौड रस्त्यावर (Paud Road Pune) फिर्यादी बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपी पाटील, ताकवणे यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (BJP Maharashtra General Secretary Muralidhar Mohol), त्यांच्या मावसभावाचा नावाचा वापर करुन त्यांनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितली. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाकडून (Yuva Morcha of Bharatiya Janata Party) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ३ कोटी रुपये हवे आहेत. पैसे न दिल्यास भविष्यात बांधकाम व्यवसायाला हानी पोहचवू, अशी धमकी पाटील आणि ताकवणे यांनी दिली.

 

आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर केला.
बांधकाम व्यावसायिकाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून
पोलीस निरीक्षक (गुन्हे) बडे (Police Inspector Bade) तपास करत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | On Name Of Ex-Mayor of Pune and Maharashtra general
secretary of BJP Muralidhar Mohol demanding extortion of 3 crores from the builder;
A case has been registered against both of them in Kothrud police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा