Pune Crime News : इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू, विमानतळ परिसरातील घटना

पुणे (Pune) : पोलीसनामा ऑनलाईन – Pune बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली कोसळून बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना विमानतळ येथे घडली आहे. या ठिकाणी नवीन इमारतीचे काम सुरु आहे.

मल्लेश बसप्पा चलवादी (वय 28) असे मृत्यु झालेल्या कामगाराचे नाव आहे. ठेकेदार दिनेश हरीवाल गोस्वामी (वय 38) याच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक सारंग दळे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील सैनिक वसाहतीतील एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे.

या इमारतीचा कामगारांचा ठेका दिनेश याने घेतला होता. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मल्लेश चलवादी हा काम करत होता.

यावेळी अचानक पाय घसरून तो चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता.

याबाबत पोलिसांकडे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

गेल्या महिन्यात (दि. 24 मे) हा प्रकार घडला होता.

यानंतर कागदपत्रांचे चौकशी केल्यानंतर ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मललेशचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

काम करून घेत असताना ठेकेदाराने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट, सुरक्षित जाळी अशी सामग्री पुरवली नाही.

उघड्या डक्टवर योग्य ते झाकण न ठेवता हलगर्जीपणा केल्यामुळेच मल्लेश चलवादीचा मृत्यू झाला.

अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

Also Read This : 

Pune Accident News | भरधाव वाहनाच्या धडकेत 22 वर्षीय तरूणाचा मृत्यू, दुसरा युवक गंभीर जखमी; सासवड-पुणे रस्त्यावरील घटना

 

विलायचीचं अधिक सेवन पडू शकतं महागात, ‘या’ आजारांचे होऊ शकता शिकार, जाणून घ्या

 

Executive Engineer Trainee | इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! 280 जागांसाठी भरती, लवकर करा अर्ज

 

Vitamin C Side Effects : इम्यूनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-C चा करा संतुलित वापर, होऊ शकतात ‘हे’ 5 साईड इफेक्ट, जाणून घ्या

 

Ahmednagar News | मामाला अडकविणार्‍या भाच्याची ‘हुश्शार’ मामीनं केली ‘फजिती’ अन् फोडलं ‘बिंग’, अहमदनगर जिल्ह्यातील घटना

 

COVID-19 : कोरोनाची ‘सौम्य’ लक्षणे गंभीर संसर्गात बदलण्यापासून रोखण्यासाठी ‘या’ चुका टाळा, जाणून घ्या

 

स्पर्मपेक्षा कितीतरी पट जास्त किमती, जाणून घ्या – महिलांच्या एग्ज बाबत ‘या’ 8 रंजक गोष्टी

 

‘धतूरा’ पुरूषांसाठी वरदान ! टक्कलेपण दूर करण्यासह वाढवतो शारीरिक ‘Power’, ‘या’ पध्दतीनं वापरा, जाणून घ्या