Pune Crime News | वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्याची करोडोची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे शाखेकडून एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वैद्यकीय महाविद्यालय (Medical College) हस्तांतरित करण्याचे आश्वासन देत करोडो रुपये रक्कम स्वीकारून खोटे व बनावट एम.ओ. यु. तयार करून फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरचे (Dhanvantari Ayurvedic Medical College and Research Centre) मुख्य प्रशासकीय अधिकारी संजोग महादेव देशमुख (Sanjog Mahadev Deshmukh) याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Crime News)

या संदर्भात फिर्यादी परिक्षीत नामपूरकर (Parikshit Nampurkar) यांनी तात्काळ त्यांचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे (Adv. Vijay Singh Thombre) यांचे मार्फत पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचे तपास अधिकारी विशाल मोहिते (Vishal Mohite) यांनी आरोपी संजोग देशमुख याला अटक (Arrest) केली आहे. तसेच, महादेव देशमुख हा मार्च 2022 पासून अशाच फसवणुकीच्या प्रकरणात ईडी च्या कोठडीत (ED Custody) आहे. (Pune Crime News)

अटक करण्यात आलेल्या आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सी. पी. शेळके (Magistrate C. P. Shelke) यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने प्रकणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आोपीला 15 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात फिर्यादी तर्फे अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी कामकाज पाहिले तसेच सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. रेणुका देशपांडे कर्जतकर (Adv. Renuka Deshpande Karjatakar) यांनी कामकाज पाहिले

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यातील बुधवार पेठेत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची पुन्हा मोठी कारवाई !
अल्पवयीन मुलीसह 7 बांगलादेशी नागरिकांना पकडले (Video)

दाजीचा खून करुन मेव्हण्याची आत्महत्या, पुण्यातील खळबळजनक घटना

कल्याणीनगर : सिक्रेट पोलीस असल्याचे सांगत चोरट्याने मोबाईल घेऊन ठोकली धुम