Pune Crime News : रस्त्यावरील वाहन चालकांना शिवीगाळ करणार्‍या लातूर येथील युवकास पुण्यात अटक

पुणे (pune news ): पोलीसनामा ऑनलाइन – रस्त्याच्या मध्यभागी दुचाकी आडवी लावून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना आडवून शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला रोखण्यास गेलेल्या पोलिसांचीच गचांडी धरून त्यांना शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी सुरज विजय घोडके (वय 24, रा. काळेवाडी, मूळ महाराणा प्रताप नगर म्हाडा कॉलनी लातूर ) असे या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलीस हवालदार कुंडलिक प्रल्हाद गवळी (वय 50) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोंढवा वाहतूक शाखेत कार्यरत आहेत.

मंगळवारी रात्री ते कोंढवा येथील स्मशानभूमीजवळ सार्वजनिक रस्त्यावर वाहतूक नियमन करीत होते.

यावेळी आरोपीने रस्त्याच्या मध्यभागी दुचाकी आडवी लावून येणार्‍या-जाणार्‍या लोकांना शिवीगाळ करत होता.

फिर्यादी आणि त्याचे सहकारी त्याठिकाणी जाऊन त्याला गाडी रोडच्या बाजूला घेण्यासाठी सांगितले.

मात्र आरोपीने पोलिसांचीच गचांडी पकडून त्यांच्या शर्टचे बटन तोडून ढकलून देत शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

Also Read This : 

 

Pune Crime News | पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा सराफ व्यावसायिकास ‘दणका’, केली मोक्का अंतर्गत कारवाई, जाणून घ्या प्रकरण

 

दररोज दह्यासोबत गुळाचं सेवन या वेळी करा, Immunity वाढण्यासह होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली गाडीतूनच मुंबईची पाहणी, घेतला संपूर्ण आढावा

 

फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवायचंय तर ‘ही’ 5 योगासने करा, कोरोनापासून होईल बचाव, जाणून घ्या

 

Latur News | 8 महिन्यापासून पगार न मिळाल्याने निलंगा नगरपरिषदेच्या कंत्राटी सफाई कामगाराची आत्महत्या, प्रचंड खळबळ