Pune Crime News | ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर तरूणीचा एकतर्फी प्रेमातून विनयभंग, तरूणाला अटक

पुणे (Pune Crime News) : पोलीसनामा ऑनलाइन – मध्यवस्तीत ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक व जिम ट्रेनर (Gym trainer) असणाऱ्या तरुणीला एकतर्फी प्रेमातून (One sided love) सतत त्रास देऊन विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे (Pune Crime News) पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.

याप्रकरणी अर्जुन बरमेडा (वय 25) असे अटक (Arrest) आणि न्यायालयाने (Court) सुटका केली आहे. याबाबत 31 वर्षीय तरुणीने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) तक्रार दिली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी ही ऑनलाईन फिटनेस प्रशिक्षक आहेत. तसेच जिममध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून नोकरी करतात. तरुणीची काही वर्षांपूर्वी कॉमन मित्रांच्या माध्यमातून अर्जुन याची ओळख झाली होती. त्यानंतर ते चांगले मित्र झाले. मात्र यानंतर अर्जुन हा तरुणीवर एकतर्फी प्रेम करू लागला. त्याने काही वेळा लग्नासाठी तिच्याकडे मागणी घातली. तरुणीने त्याला नकार दिला होता. यानंतर एकेदिवशी रस्त्यात अडवून त्याने तरुणीचा हातात असलेला मोबाईल हिसकावून घेतला. तर, पाहून तो पुन्हा परत दिला. तर शिवीगाळ केली. तसेच, तिला सतत फोन व व्हाट्सअप मॅसेजकरून त्रास दिला. खूपच त्रास देत असल्याने तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली आहे.

Wab Title :- Pune Crime News | Online fitness instructor and gym trainer molested by one-sided love, young man arrested

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये