Pune Crime News | परवानगी न घेता कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन, शिवसेना उबाठा पक्षाचे शहराध्यक्ष अॅड. सचिन भोसलेंवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पोलिसांची परवानगी न घेता कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केल्या प्रकरणी शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) पक्षाचे शहराध्यक्ष आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर वाकड पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. वाकड ते डांगे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगलनगर समोर थेरगाव येथे शनिवारी (दि.21) रात्री नऊ ते दहा दरम्यान कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (Pune Crime News)

याबाबत वाकड पोलीस ठाण्यातील (Wakad Police Station) पोलीस हवालदार सचिन नामदेव सुतार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार न्यू आझाद युवक संघ. अॅड. सचिनभाऊ भोसले युवा मंचचे अध्यक्ष अॅड. सचिन सुरेश भोसले (Adv. Sachin Suresh Bhosale) यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी यांच्यावर आयपीसी 341, 283, 34 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(3) सह 135, 33(1), 131, 102 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू आझाद युवक संघ. अॅड. सचिनभाऊ भोसले युवा मंचच्या वतीने वाकड येथून डांगे चौकाकडे जाणाऱ्या दुहेरी मार्गावर मंगलनगर समोर स्टेज लावला.
याठिकाणी ह.भ.प. सुप्रिया साठे ठाकूर (ठाकुर पिंपरी चाकण) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला.
कीर्तनाचा कार्यक्रम घेताना पोलिसांची परवानगी घेतली नाही.
तसेच आयुक्तालयाच्या हद्दीत लागु असलेल्या मनाई आदेशाचा भंग करुन लोकांची गर्दी जमवली.
कार्यक्रमासाठी रोड बंद करुन लोकांना जाण्यास अडथळा निर्माण केला असे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी जाधव (API Sambhaji Jadhav) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील चित्तरंजन वाटीकेतून दोन चंदनाच्या झाडांची चोरी, एक महिन्यानंतर घटना उघडकीस