Pune Crime News | जेलमधून जामीनावर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराने धावत्या रेल्वेतून पत्नी, मुलीला ढकलले, 2 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जेलमधून जामीनावर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराने (Pune Criminals) पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलीला धावत्या रेल्वेतून ढकलून दिल्याची घटना समोर आली आहे (Murder In Pune). यामध्ये 2 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असून तिच्या आईवर ससून रूग्णालयात (Sasoon Hospital) उपचार सुरू आहेत. (Pune Crime News)

आर्या आकाश भोसले (2, रा. पद्मावती) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. तिची आई वृषाली आकाश भोसले (22) ही गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सराईत गुन्हेगार आकाश भोसले याच्याविरूध्द लोहमार्ग पोलिसांनी (Pune Lohmarg Police) गुन्हा दाखल केला आहे. आकाश भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्याविरूध्द शहरातील वेगवगळया पोलिस ठाण्यात 7 गंभीर गुन्हयांची नोंद आहे. त्याने पहिल्या पत्नीचा देखील खून केला होता. सध्या तो जेलमधून (Yerwada Jail) जामीनावर बाहेर आलेला आहे.

आरोपी आकाश भोसले हा त्याची पत्नी वृषाली आणि मुलगी आर्याला घेऊन दि. 19 मार्च रोजी मुंबईकडे जात होता.
हाजी अली दर्ग्यावर त्याला जायचे असल्याचे त्याने पत्नीला सांगितले होते. प्रगती एक्सप्रेसमधून (Pragati Express Pune To Mumbai) ते सर्वजण जात होते. खडकी रेल्वे स्टेशन (Khadki Railway Station) परिसरात त्याने पत्नीला दरवाज्याजवळ बोलावले. त्यावेळी वृषालीच्या कडेवर 2 वर्षाची आर्या होती. धावत्या रेल्वेमधून आकाशने वृषालीला ढकलून दिले. घडलेली घटना एवढी भयंकर होती की रेल्वेत प्रवास करणार्‍या प्रवाशांनी तात्काळ साखळी ओढून रेल्वे थांबविली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी वृषाली आणि आर्या यांना तात्काळ ससून रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान आर्याचा मृत्यू झाल्याची माहिती लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद खोपीकर (PI Pramod Khopikar) यांनी दिली. लोहमार्ग पोलिसांनी (Railway Police Pune) आकाश भोसले याला अटक केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुप्रिया जगताप (API Supriya Jagtap) करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Out on bail, innkeeper pushes wife, daughter from running train, 2-year-old girl dies

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | संजय गायकवाडांच्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन अजित पवार संतप्त, म्हणाले- ‘…तर राज्य चालवणं कठीण होईल’ (व्हिडिओ)

Popatrao Gawade | राष्ट्रवादीचे माजी आमदार, शरद पवारांचे निकटवर्तीय पोपटराव गावडे रूबी हॉलमध्ये दाखल, उपचार सुरू

Pune Crime Suicide News | भाजप नेत्याच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलीची पुण्यात आत्महत्या