Pune Crime News | पुण्यातील जनवाडी परिसरात गुंडांची दहशत, तलवारी उगारून तीन दुकानांची तोडफोड; दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये कोयते, तलवारी उगारून परिसरात दहशत निर्माण करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पुण्यातील जनवाडी परिसरात तीन जणांच्या टोळक्याने तलावरी उगारून तीन दुकानांची तोडफोड (Vandalism of Shops) केली. तसेच एकावर तलवारीने वार करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) दोन जणांना अटक केली आहे. (Pune Crime News)

योगेश अनंता गायकवाड, मयूर मोरे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्याबरोबर
असलेल्या साथीदाराविरुद्ध व अटक केलेल्या आरोपींवर आयपीसी 324, 34 सह फौजदारी सुधारणा कायदा, आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुहास सुरेश माने (वय 30, रा. शांतीसागर सोसायटी, सकाळनगर, पुणे) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. गायकवाड, मोरे सराईत गुन्हेगार आहेत. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड, मोरे आणि साथीदारांची दोन दिवसांपूर्वी जनवाडी परिसरात एकाशी
भांडण झाले होते. त्यांनी जनवाडी परिसरात रविवारी (दि.3) रात्री आठच्या सुमारास तलवारी (Sword) उगारून
दहशत माजवली. त्यांनी राजकमल स्वीट मार्ट, अक्की मेन्स पार्लर व न्यु तृप्ती चिकन सेंटर या दुकानांची तोडफोड केली.

त्यावेळी फिर्यादी सुहास माने हे हॉटेलमधून पार्सल घेऊन सकाळनगर येथे घरी जात होते. त्यावेळी दुकानांची तोडफोड करण्यात येत असल्याचे पाहून माने यांनी दुचाकी थांबवली.
त्यावेळी आरोपी योगेश गायकवाड माने यांच्या जवळ आला. त्याने काय बघतो, अशी विचारणा करुन हातातील
तलवारीने खांद्यावर वार करुन जखमी केले. यानंतर हत्यारे हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली.
दुकानदारांना धमकावून दुकाने बंद करण्यास सांगितले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कोळी (API Koli) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुतण्याकडून पाऊण कोटींची फसवणूक, पुण्यातील प्रकार

पुण्यातील वाकडा पुल येथील खुनाच्या प्रयत्नातील चार आरोपींची निर्दोष मुक्तता

Sanjay Raut | इंडिया आघाडीची उद्या दिल्लीत बैठक, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार, ‘हे’ नेते नाराज, संजय राऊतांनी दिली माहिती