Pune Crime News | स्वारगेट एसटी स्टँडवर प्रवाशांचे मोबाईल चोरणारा गजाआड, 12 मोबाईल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | स्वारगेट बस स्थानकावर (Swargate Bus Stand) गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या (Mobile Thief) चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या (Pune Crime News) आरोपीकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे 60 हजार रुपये किमतीचे 12 मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. अंकुश अशोक कराड (वय-39 रा. मु.पो. येली, ता. पाथर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

याबाबत 5 जून रोजी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे श्रीगोंदा बसमध्ये चढत असताना गर्दीमध्ये कोणीतरी त्यांच्या खिशातून मोबाईल काढून पळून जाताना त्यांच्या नातेवाईकांनी पाहिले. (Pune Crime News) त्यावेळी नातेवाईकांनी आरडाओरडा केल्यानंतर स्वारगेट एसटी स्टँडवर पेट्रोलिंग करणारे तपास पथकाच्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे फिर्यादी यांचा मोबाईल सापडला. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे 60 हजार रुपये किमतीचे 12 मोबाईल मिळाले. पुढील तपास पोलीस हवालदार मुकुंद तारु (Police Constable Mukund Taru) करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (Addl CP Pravin Kumar Patil), परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil), सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)

 

Advt.

यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर (Senior PI Ashok Indalkar),
पोलीस निरीक्षक गुन्हे सोमनाथ जाधव (PI Somnath Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे (API Prashant Sande),
पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले (PSI Ashok Yewle) पोलीस
अंमलदार मुकुंद तारु, शिवा गायकवाड, फिरोज शेख, रमेश चव्हाण,
संदीप घुले, अनिस शेख, दिपक खेंदाड, सुरज पवार, प्रविण गोडसे यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime News Passenger mobile phone thief arrested at Swargate ST stand, 12 mobile phones seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा