Pune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा

पुणे (Pune Crime News) : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यातील पेट्रोल पंपावरील (Pune Petrol Pump) रोकड बँकेत भरण्यास निघालेल्या मॅनेजरजवळची (Petrol Pump Manager) पावणे नऊ लाखांची रोकड दोघांनी लुटली (Cash Looted) आहे.
भरदिवसा कोयता दाखवत ही रोकड लुटली असून, पुण्यातील या गुन्हेगारी घटनेमुळे (Pune Crime News) परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) बाळासाहेब पंढरी आंभोरे (वय 36) यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तीबर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.(Petrol pump manager robbed of Rs 8.74 lakh for showing scythe crime registered at Wanwadi police station)

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

वानवडी पोलिस ठाण्यातील (Wanwadi Police Station) अधिकारी व कर्मचार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंभोरे हे सय्यदनगर येथील एचपी पेंट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम करतात.
दरम्यान, शनिवार व रविवारची जमलेली 8 लाख 74 रुपयांची रोकड घेऊन आज दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास बँकेत भरण्यास जात होते.
ते काळेपडळ येथील रेल्वे अंडरग्राऊंड रस्त्याने पुढे गेल्यानंतर समोरून मोपेडवरून आलेल्या दोघांनी त्यांची दुचाकी आडवी लावत अडविले.
तर एकाने कोयता भिरकावून मारला आणि त्यानंतर कोयता दाखवत फिर्यादी यांच्याजवळ रोकड असलेली बॅग घेऊन पसार झाले.
यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.
त्यानुसार पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान भरदिवसा रोकड लुटल्याची घटना घडल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title : Pune Crime News | Petrol pump manager robbed of Rs 8.74 lakh for showing scythe crime registered at Wanwadi police station

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Indian Railway Recruitment 2021 | खुशखबर ! भारतीय रेल्वेमध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी, पगार 44900; जाणून घ्या प्रक्रिया

विप्रोचे चीफ एक्झीक्यूटिव्ह आहेत देशातील सर्वात महागडे अधिकारी, इतकी आहे त्यांची सॅलरी

Dream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं आणि अ‍ॅग्रीकल्चर प्रापर्टीची विक्री, जाणून घ्या सविस्तर

काय सांगता ! होय, 74 % भारतीय कर्मचार्‍यांना आवडला ’वर्क फ्रॉम होम’ पर्याय