Pune Crime News | सन 2011 पासून ठेवले शारिरीक संबंध, मुलगी झाल्यानंतर देखील आजतागायत केलं नाही लग्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –Pune Crime News | सन 2011 मध्ये लग्नाचे आमिष दाखवुन (Lure Of Marriage) शारिरीक संबंध (Physical Relation) ठेवले. मुलगी झाल्यानंतर देखील आजतागायत लग्न न करता फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात (Yerwada Police Station) एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर बलात्काराचा (Rape In Pune) देखील गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Pune Crime News)

बबलु इस्माईल सय्यद उर्फ राज सुभाष कांबळे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत लातूर जिल्हयातील उदगीर येथील 37
वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सन 2011 मध्ये आरोपीने त्याचे नाव राज सुभाष कांबळे
असल्याचे सांगुन फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर फिर्यादीसोबत शारिरीक संबंध ठेवले. त्यातुन फिर्यादीला मुलगी झाली. त्यानंतर आजतागायत आरोपीने फिर्यादीशी लग्न करण्यास टाळाटाळ केली. तसेच तो घरातुन न सांगता निघुन गेला.
याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक गाताडे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Physical relationship since 2011, even after having a daughter, she has not married till date

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Imtiaz jaleel | छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा, इम्तियाज जलील यांनी राम मंदिरातून केलं शांत राहण्याचं आव्हान (व्हिडिओ)

NCP MLA Amol Mitkari | ‘अन् तथाकथित ‘हिंदु जननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले, त्यामुळे…’, अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

Pune Crime News | मुंढव्यात 16 वर्षीय मुलीला ब्लॅकमेल करून बलात्कार, 20 वर्षीय युवकास अटक