Pune Crime News | पोलीस आयुक्त रितेश कुमार अ‍ॅक्शन मोडवर! येरवडा, विश्रांतवाडी, खडकी, लोणीकंद आणि चतु:श्रृंगी परिसरातील 14 सराईत गुन्हेगार तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे पोलीस आयुक्तालयातील (Pune Police Commissionerate) परिमंडळ चारच्या हद्दीतील येरवडा, विश्रांतवाडी, खडकी, लोणीकंद आणि चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील तब्बल 14 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.2) करण्यात आली आहे. एकाच दिवशी 14 गुन्हेगारांना तडीपार (Tadipaar) केल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवर (Pune Crime News) वचक निर्माण झाला आहे.

परिमंडळ चार मधील पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), दंगा, दुखापत, जबरी चोरी, घरफोडी (Burglary), चोरी (Theft), महिलांवरील अत्याचार (Violence against Women), बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, अवैध जुगार अड्डा (Gambling Den) चालविणे, अवैध दारु विक्री करणे, अंमली पदार्थाची विक्री, अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कायद्याचा वचक रहावा यासाठी संबंधित पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तडीपारीचे प्रस्ताव पाठवले होते.

तडीपारीच्या प्रस्तवाची पोलीस उपायुक्त परिमंडळ चार यांनी चौकशी करुन 14 गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम (Maharashtra Police Act) 56 प्रमाणे कारवाई केली आहे. 14 गुन्हेगारांना पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड आयुक्तालय (Pimpri Chinchwad Commissionerate) आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Pune Crime News)

येरवडा पोलीस ठाण्याच्या (Yerawada Police Station) हद्दीतील तडीपार गुन्हेगार –

1. मनोज भागवत कांबळे (वय-28 रा. यशवंतनगर, येरवडा), 2. इस्माईल रियाज शेख (वय-22 रा. राजीव गांधी नगर, येरवडा), 3. देवीबाई रमेश राठोड (वय-45 रा. नाईकनगर, येरवडा), 4. सुमन मोहन नाईक (वय-50 रा. नाईकनगर येरवडा), 5. भारती कृष्णा चव्हाण (वय-32 रा. येरवडा), 6. कमल राजु चव्हाण (वय-50 रा. येरवडा), 7. लक्ष्मी गोपाळ पवार (वय-23 नागपुर चाळ येरवडा), 8. मोहित उर्फ बिट्या संजय सुर्यवंशी (वय-23 रा. नागपुर चाळ, येरवडा)

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील (Vishrantwadi Police Station)तडीपार गुन्हेगार –

1. सुरज उर्फ गुंड्या मनोहर माचरेकर (वय-40 रा. भीम नगर, विश्रांतवाडी), 2. दिलीप गोविंद सुर्यवंशी (वय-31 रा. काशीद चाळ, कळस, विश्रांतवाडी), 3. विवेक चंद्रकांत चव्हाण (वय-27 रा. बौद्ध विहार जवळ, येरवडा)

खडकी पोलीस ठाण्याच्या (Khadki Police Station)
हद्दीतील गौरव दिपक मिसाळ (वय-21 रा. इंदिरानगर वसाहत, खडकी),
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station)
हद्दीतील नागनाथ संभाजी गिरी (वय-19 रा. दुर्गामाता मंदिराजवळ, खराडी)
आणि चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या (Chaturshringi Police Station)
हद्दीतील जावेद जानशा शेख (वय-53 रा. मंजाळकर चौक, वडारवाडी, पुणे) असे तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पुढील काळात देखील सराईत गुन्हेगारांवर अशाच प्रकारची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Web Title :- Pune Crime News | Police Commissioner Retesh Kumar on action mode! 14 inns in Yerwada, Vishrantwadi, Khadki, Lonikand and Chatu:Shringi areas are under investigation.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Beed Accident News | माजलगाव ते तेलगाव रस्त्यावर कार आणि बाईकचा भीषण अपघात; 3 तरूणांचा जागीच मृत्यू

Maharashtra Pension News | कर्नाटक-महाराष्ट्र सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना मिळणाऱ्या निवृत्तीवेतनात दहा हजार रूपयांनी वाढ

Maharashtra MLC Elections | कोकणात महाविकास आघाडीला मोठा धक्का; कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी