Pune Crime News | पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून विमाननगर-लोहगाव परिसरातील 2 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई, केलं वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबध्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी विमाननगर पोलिस स्टेशनच्या (Viman Nagar Police Station) हद्दीतील लोहगाव (Lohegaon) परिसरातील 2 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये (MPDA Act Maharashtra) कारवाई केली आहे. त्यांना वर्षभराकरिता नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) स्थानबध्द करण्यात आले आहे.

गणेश उर्फ गणी सखाराम राखपसरे Ganesha Alias Gani Sakharam Rakhapsare (19, रा. राखपसरे वस्ती, लोहगाव, पुणे) आणि नितीन किसन सकट Nitin Kisan Sakat (21, रा. राखपसरे वस्ती, लोहगाव, पुणे) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminals On Pune Police Records) आहेत. त्यांनी त्यांच्या साथीदारांसह मिळुन विमाननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पिस्टल (Pistol), लोखंडी रॉड, कोयता (Koyta) या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न (Attempt To Kill), वाहनांची तोडफोड, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे गेले आहेत. मागील 5 वर्षामध्ये त्यांच्याविरूध्द प्रत्येकी 3 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. (Pune Crime News)

दोघांपासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे परिसरातील नागरिक त्यांच्याविरूघ्द उघडपणे
तक्रार करीत नव्हते. दरम्यान, विमाननगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे
(Sr PI Vilas Sonde) यांनी त्यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी पीसीबीमार्फत
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. पोलिस आयुक्तांनी त्या प्रस्तावास मान्यता
देत दोघांवर एमपीडीएची कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आयुक्तपदाचा पदभार
स्विकारल्यापासून आतापर्यंत 17 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली आहे.

Web Title :  Pune Crime News | Police Commissioner Ritesh Kumar took MPDA action against 2 innkeepers in Vimannagar-Lohgaon area, lodged in Nagpur Jail for a year.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘कर्नाटकचा पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, देशात फक्त मोदी पॅटर्न’, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल (व्हिडिओ)

Bullock Cart Race | बैलगाडा शर्यतीच्या श्रेयवादावरून खासदार अमोल कोल्हे आणि आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांमध्ये स्टेटस वॉर