Pune Crime News | जबरी चोरी करणाऱ्या हडपसरमधील पंकज उर्फ पंक्या वाघमारे टोळीवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 15 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | घरात घुसून जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊन जबरी चोरी करणाऱ्या पंकज उर्फ पंक्या गोरख वाघमारे व त्याच्या इतर चार साथीदारांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी मोक्का कायद्यांतर्गत (MCOCA Action) Mokka कारवाई केली आहे. ही घटना हडपसर परिसरात 25 डिसेंबर 2022 रोजी घडली होती.

टोळी प्रमुख पंकज उर्फ पंक्या गोरख वाघमारे (व-24 रा. बंटर शाळे जवळ, गाडीतळ, हडपसर), स्वप्निल उर्फ बिट्या संजय कुचेकर (वय-22 रा. मांजरी), राहुलसिंग रविंद्र सिंग भोंड (वय-18 रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर), आकाश उर्फ आक्या गोविंद शेंडगे (वय-20 रा. मांजरी बुद्रुक) आणि एका विधीसंघर्षीत बालकावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपींवर हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) आयपीसी 395, 307, 504, 506, महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), आर्म अॅक्ट (Arm Act) गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींनी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वत:च्या फायद्यासाठी किंवा टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी परिसरात दहशत माजवली आहे. त्यांनी हिंसाचार, हिंसाचाराची धमकी देऊन, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, विना परवाना शस्त्र बाळगणे, पोलिसांच्या आदेशांचे भंग करणे, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, मालमत्तेचे नुकसान करणे असे गंभीर गुन्हे केले आहेत.

हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा (मोक्का) अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे (Senior Police Inspector Arvind Gokule) यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त रंजन शर्मा (Addl CP Ranjan Sharma) यांना सादर केला होता. या प्रकरणाची छाननी करुन आरोपींविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, रंजन शर्मा, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख,
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक गुन्हे दिगंबर शिंदे
(Police Inspector Digambar Shinde), विश्वास डगळे (Police Inspector Vishwas Dagle),
तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे (API Vijayakumar Shinde),
पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे (PSI Avinash Shinde) पोलीस अंमलदार यांच्या पथकाने केली.

पोलीस आयुक्तांची 15 वी कारवाई

(CP Retesh Kumaarr) पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर लक्ष देऊन गन्हे करणारे
आणि दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून 15 टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

Web Title :-Pune Crime News | Police Commissioner Ritesh Kumar’s 15th MCOCA action On Pune Criminals,

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Koregaon Crime News | सोने घडवण्याच्या बहाण्याने ३१ लाखांचा ऐवज घेऊन कारागीर फरार; कोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल

Pune Pimpri Chinchwad Crime | महिलेचा विनयभंग करत वडिलांना मारहाण, आरोपीला अटक; चाकण परिसरातील घटना