Pune Crime News | रिक्षाच्या आडबाजूला सुरु असलेल्या कल्याण जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा, 8 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहर आणि परिसरात अवैधरित्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर (Kalyan Gambling Den) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाकडून (SS Cell) मागील काही दिवसांपासून कारवाई केली जात आहे. बुधवारी फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणेश्वर मित्रमंडळ चौकातील कल्याण जुगार मटका अड्ड्यावर छापा (Pune Crime News) टाकून 8 जणांवर कारवाई करुन 9 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवारी (दि.22) फरासखाना पोलीस ठाण्याच्या (Faraskhana Police Station) हद्दीतील पुणेश्वर मित्रमंडळ चौकात रिक्षाच्या आडबाजूला मोकळ्या जागेत सुरु असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पाळत ठेवून छापा टाकला. त्यावेळी पैशावर जुगार खेळणारे आणि खेळवणाऱ्या 7 जणांना ताब्यात घेऊन 9 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी 8 आरोपींवर फरासखाना पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत (Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलीस अंमलदार अजय राणे, मनिषा पुकाळे,
तुषार भिवरकर, संदीप कोलगे, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | Police raid on Kalyan gambling dens running across the rickshaw, action against 8 people

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rani Mukerji | राणी मुखर्जीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलर पाहताच क्षणी अंगावर येईल काटा

Shiv Thakare | मराठी चित्रपट न करण्याबद्दल शिव ठाकरेचे वक्त्यव्य; म्हणाला – ‘काही चित्रपटांसाठी माझी निवड…’

Pune Kasba Peth Bypoll Election | धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय होणार – मोहन जोशी