Pune Crime News | प्रेमविवाहात फसवणूक करुन धर्मांतर करण्याचा दबाव ! अमेरिकेत नेऊन केला छळ, अमेरिकन पोलिसांच्या मदतीने केली सुटका; डेक्कन पोलिस ठाण्यात 6 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मुलीच्या प्रेमसंबंधामुळे तिच्या आईवडिलांनी कोट्यावधी खर्च करुन तिचा विवाह (Love Marriage) लावून दिला. मानपान घेऊनही मुलीचा गृह प्रवेशासाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पॅकेजची मागणी केली. नणंदेने धर्मांतर करण्यासाठी त्रास दिला. त्यानंतर पतीने अमेरिकेत बोलावून घेऊन तेथे छळ (Crime Against Woman) सुरु केला. शेवटी तरुणीने अमेरिकन पोलिसांच्या (American Police) मदतीने स्व: तची सुटका करुन घेतली. त्यानंतर आता ही नवविवाहिता पुण्यात आल्यावर तिने डेक्कन पोलिसांकडे (Deccan Police) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी अरुण वर्मा (Arun Verma), परविन अरुण वर्मा (Parvin Verma), लव वर्मा (Love Verma), कुश वर्मा Kush Verma (सर्व रा. खारघर, मुंबई) विधु वर्मा (Vidhu Verma) आणि डॅनियल (Dyniel) यांच्यावर गुन्हा (FIR In Pune Police) दाखल केला आहे. हा प्रकार नवी मुंबईतील खारघर (Kharghar, Mumbai) तसेच अमेरिकेत १ डिसेबर २०२२ पासून आतापर्यंत घडला आहे. याबाबत एका ३३ वर्षाच्या विवाहितेने डेक्कन पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. ४३/२३) दिली आहे. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे लव वर्मा यांच्याबरोबर प्रेम संबंध होते. त्यानंतर त्यांनी दोन्ही परिवाराच्या संमतीने आंतरजातीय विवाह करण्याचे ठरले. ३० मार्च २०२२ रोजी हॉटेल कॉनरॅड येथे साखरपुडा झाला. त्यासाठी १० लाखांचा खर्च फिर्यादीच्या वडिलांनी केला. यावेळी हिंदु धर्मातील शुभ संकेत म्हणून फिर्यादीच्या नातेवाईकांनी मुलाच्या आईवडिलांना चांदीची गणेश मुर्ती दिली. हे तिच्या नणंदेचा पती डॅनिअल याला आवडले नाही. त्याने वाद घातला. त्यानंतर डिसेबरमध्ये मुलाच्या वडिलांनी डेसटिनेशन वेडिंगची मागणी केली. त्यावर ७५ लाख रुपये खर्च केले. तसेच हुंडा म्हणून ५० हजार डॉलर देण्यात आले. त्याअगोदर लव वर्मा याचे फिर्यादी यांच्याशी प्रेमसंबंध असताना तो तिच्या खात्यातून वेळोवेळी पैसे घेत असत. लग्नात पतीच्या आईस व दोन बहिणीना प्रत्येकी ५ तोळ्यांचा सोन्याचा हार देण्यात आला. दरम्यान फिर्यादीच्या पतीचा जुळा भाऊ कुश हा लग्नामध्ये सर्वासमोर ही माझी हाफ वाईफ आहे, असे बोलत होता.
नणंदेच्या पतीने तू खिश्चन धर्म स्वीकार असे सप्तपदी सुरु असताना सांगितले. त्याला नकार दिल्यावर तो रागाने निघून गेला. अलिबागला लग्न झाल्याने त्यांनी नववधुला सासरी नेण्याऐवजी आजीकडे पाठविले. पतीही पुण्यात आजीकडे २ दिवस राहिला. फिर्यादीच्या सासूने गोव्यात ५ स्टार हॉटेलमधील हनिमून पॅकेजची मागणी केली. त्यानंतर वधुला घर प्रवेश दिला जाईल, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी लग्नातील दागिन्यांसाठी ज्वाईंट अकाऊंट काढायला सांगितले. तसेच अकाऊंट काढल्यावर तिचा गृहप्रवेश साध्या पद्धतीने करण्यात आला. नणंद व तिचा पती मारहाण करायला आला. तिचा छळ केला जाऊ लागला. पतीही शिवीगाळ करु लागल्याने ती माहेरी पुण्यात निघून आली. त्यानंतर तिचा पती अमेरिकेला निघून गेला. आमच्या घरात पाऊल ठेवू नकोस, अमेरिकेत आली तर तुझे पाय तोडून टाकेल, हे लग्न मोडले आहे, असे सांगितले.
त्यानंतर साखरपुड्यावेळी पतीचा जुळा भाऊ कुश याने केलेल्या कृत्याबाबत तिने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही तक्रार मागे घ्यावी असे सांगितले. तु अमेरिकेत ये, आपण आपले लग्न टिकवूया असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी १४ फेब्रुवारी रोजी अमेरिकेला गेली. तेथे पोहचताच पतीने त्रास देण्यास सुरुवात केली. माझ्या भावाविरोधात दिलेली तक्रार अगोदर मागे घे. तरच मी तुला नांदवतो,
असे म्हणून तिला जेवण देणे बंद केले. घरामध्ये कोणतीही जीवनावश्यक वस्तू ठेवली नाही.
तिला पुन्हा नवीन टिव्ही खरेदी करण्यास लावला. तिला क्रूर वागणूक दिली.
शेवटी तिने अमेरिकेतील पोलिसांना ९११ वर कॉल करुन मदत मागितली.
पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली. सध्या तो जामिनावर आहे. तिचे वडिल अमेरिकेला गेले.
तिला पुण्यात आणल्यानंतर आता त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Web Title : Pune Crime News | Pressure to convert religion by cheating in love marriage! Tortured when taken to America, released with the help of American police; FIR against 6 persons in Deccan Police Station
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा