जेजुरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जेजुरी-सासवड रोडवरील (Jejuri-Saswad Road) बेलसर गावच्या हद्दीतील लक्ष्मी नारायण लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitution) जेजुरी पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई केली. या कारवाईत (Pune Crime News) पश्चिम बंगाल येथील दोन मुलीची सुटका केली (Rescue of Two Girls) तर लॉजच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजुरी पोलीस ठाण्याच्या (Jejuri Police Station) हद्दीतील जेजुरी-सासवड मार्गालगत असलेल्या लक्ष्मी नारायण लॉजमध्ये (Lakshmi Narayan Lodge वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास बनावट ग्राहकाला लॉजमध्ये पाठवले. ग्राहकाने खात्री करुन पोलिसांना इशारा केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी वेश्या व्यवसायासाठी पश्चिम बंगाल येथून आणलेल्या दोन मुलींची सुटका करण्यात आली. पोलिसांनी लॉज व्यवस्थापक रामा नारायण मोगाविरा (वय-38 रा. सासवड रोड, वडकी, ता. हवेली) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे.
ही कारवाई जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर (Police Inspector Umesh Tavaskar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर (PSI Nand Kumar Sonwalkar),
पोलीस हवालदार नंदकुमार पिंगळे,
पोलीस हवालदार एन.आर. दोरके, पोलीस नाईक गणेश नांदे यांच्या पथकाने केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | prostitution at a lodge on jejuri saswad road rescue of two girls by police
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Devendra Fadnavis | ठाकरे-आंबेडकरांच्या युतीवर फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका,
म्हणाले – ‘प्रकाश आंबेडकरांना माहिती नाही की…’ - IND vs NZ 3rd ODI | विराट कोहली आपल्या नावावर करू शकतो ‘हा’ विक्रम; जाणून घ्या काय आहे तो विक्रम
- Pune Crime News | पोलिस संरक्षण प्राप्त असलेल्या बिल्डर संतोष पवारकडून एकावर गोळीबार;
सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रोडवरील घटना