Pune Crime News | झोपेतून उठताना भोवळ आली, आईला हाक मारली अन्… ; २८ वर्षीय तरुणाच्या मृत्यूने हळहळ

Pune Crime News | Pune: 28-Year-Old Man Dies Suddenly After Feeling Dizzy Upon Waking, Community in Shock

पुणे : राहत्या घरात झोपेतून उठला आणि आईला हाक मारताना अचानक चक्कर येऊन एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. अक्षय देविदास रिंगे ( वय-२८, रा- नसरापूर, ता- भोर, जि- पुणे ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी भोरमधील राजगड पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अक्षयचा मृत्यू हृदयविकाराने झाला असावा,अशी शक्यता वर्तवली जात आहे. अक्षय हा सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होता. खेळाची आवड असलेला आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारा हा युवक अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

अधिक माहितीनुसार, अक्षय रविवारी सकाळी नदीत पोहण्यास गेला होता. थोडा नाश्ता केल्यानंतर अक्षयला अस्वस्थ वाटू लागल्याने तो थोडावेळ झोपला. दुपारी झोपेतून उठताना त्याला अचानक चक्कर आली. त्यावेळेस त्याने आईला हाक मारली आणि खाली कोसळला. घरातील व्यक्तींनी त्याला तातडीने रुग्णलायत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अक्षयचा मृत्यू हृदयाविकाराने झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर नेमके मृत्यूचे कारण समोर येणार आहे. अक्षयच्या पश्चात आई,भाऊ, बहीण असा परिवार आहे.

Total
0
Shares
Related Posts