Pune Crime News | पुणे : 57 कोटींचा कर बुडवणाऱ्या बिअर कंपनीला दणका, संचालकांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | महाराष्ट्र मुल्यवर्धीत कर कायदा 2002 ची प्रलंबीत थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ब्रुकाष्ट माइक्रो प्रा.लि. (Brukast Micro Pvt. Ltd.) या बिअर बनवणाऱ्या व विक्री करणाऱ्या कंपनीला राज्यकर विभागाने (Tax Department) दणका दिला आहे. 57 कोटी 48 लाख 69 हजार 415 रुपयांचा कर बुडवल्याप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

सुकेतु दत्तात्रय तळेकर Suketu Dattatraya Talekar (रा. वार्डन फ्लॅट क्र. 201, बांद्रा) आणि प्रतीक रघुनाथ चतुर्वेदी Pratik Raghunath Chaturvedi (रा. शारदा नगर, रायबरेली रोड, लखनौ) असे गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत राज्यकर निरीक्षक दिपक साहेबराव शिंदे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी दिपक शिंदे हे येरवडा येथील वस्तू व सेवाकर भावन (GST Bhavan Pune) येथे राज्यकर निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. कोणत्याही व्यापाऱ्याने एखादी वस्तू विक्री केल्यानंतर त्या वस्तूच्या कराची वसुली व्यापाऱ्याकडून करुन ती रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करायची असते. ब्रुकाफ्ट माइक्रो ब्रुइंग ही कंपनी बिअर बनवणे व व अन्न व बिअर विकण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी हडपसर परिसरातील मोहंमदवाडी येथील कोरीअंथ बॅक्वेट हॉटेल या ठिकाणी कार्यरत आहे.

कंपनीचे संचालक सुकेतु दत्तात्रय तळेकर आणि प्रतीक रघुनाथ चतुर्वेदी यांनी महाराष्ट्र मुल्यवर्धीत कर कायदा 2002 च्या कलम 20 नुसार विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक असताना त्यांना वारंवार यासंदर्भात सुचित केले होते. तसेच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, कंपनीच्या संचालकांनी योग्य तो प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे दोन्ही संचालकांवर कर चुकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे, राज्यकर सह आयुक्त रेश्मा घाणेकर,
राज्यकर उपायुक्त सुधीर खेडकर, सहायक राज्यकर आयुक्त निलम भामरे
यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर निरीक्षक दिपक शिंदे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक, 20 लाखांचा गंडा

Mahavikas Aghadi Protest | सर्व सामान्य जनतेला वीज दरवाढीचा ‘शॉक’ ! महाविकास आघाडीचे पुण्यात आंदोलन (Video)

Navneet Rana | नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध

Pune Koregaon Park Crime | कोरेगाव पार्क येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, गुन्हे शाखेकडून 6 मुलींची सुटका