Pune Crime News | पुणे : लोणीकंद – वाघोलीमध्ये 8 लाख 65 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वाघोली (Wagholi) येथील गोडाऊनमधुन सेंटरिंगच्या 420 लोखंडी प्लेटा भाडयाने घेवुन त्याने भाडे न देता तसेच त्या परत न करता फसवणूक (Cheating Case) केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात (Lonikand Police Station) तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

नाजीम झाकीर शेख Nazim Zakir Shaikh (रा. ऊरळी कांचन), अझम वजीर शेख Azam Wazir Shaikh
(रा. सय्यदनगर, हडपसर) आणि इरफान वाहिद अन्सारी ( Irfan Wahid Ansari)
(रा. सय्यदनगर, हडपसर – Sayyad Nagar Hadapsar) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात गजानन तुकाराम रासकर (49, रा. सर्व्हे नं. 21/6, क्रांती पार्क 2, खराडी, पुणे – Kharadi Pune) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, डिसेंबर 2021 ते आजपर्यंत वाघोली येथील आव्हाळवाडीमधील सैनिक कॉलनीतील तुषार असोसिएट्सच्या गोडाऊनमधून आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून सेंटरिंगच्या 420 लोखंडी प्लेटा भाडयाने घेतल्या.

लोखंडी प्लेटाचे भाडे न देता तसेच त्या प्लेटा परत न करता फिर्यादी यांची 8 लाख 65 हजार रूपयांची फसवणूक केली.
फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Pune: A case has been registered against three persons in Lonikand-Wagholi for cheating of 8 lakh 65 thousand.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Borghat Accident News | बोरघाटात बस दरीत कोसळली ! खोपोलीतील घटनेत 8 जणांचा मृत्यु, 32 जण जखमी

Radhakrishna Vikhe-Patil | ‘आदित्य ठाकरेंचा पप्पू होऊ नये’, विखे-पाटलांच्या टीकेला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

Pune Crime News | २४ वर्षाच्या मुलावर लादली अवास्तव बंधने; आईवडिलांना सांगण्याच्या धमकीने लुबाडले अडीच लाख