Pune Crime News | पुणे : तरुणीचा फोटो वापरुन इंन्स्टाग्रामवर तयार केले फेक अकाउंट, मॉर्फ फोटो व्हायरल करुन विनयभंग

Kondhwa Pune Crime News | Pune: Morphed obscene photos of a woman went viral, incident in Kondhwa area

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | एका तरुणीचा फोटो वापरून तिच्या नावाने इंस्टाग्रामवर (Instagram) अश्लील नावाने बनावट अकाउंट तयार करून तिचे मॉर्फ केलेले फोटो (Morphed Photos) मैत्रिणीला पाठवून बदनामी (Defamation) केली. तसेच तरुणीचा पाठलाग करुन लग्न होऊ देणार नसल्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका 27 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2021 पासुन ते 2 एप्रिल 2024 या कालावधीत सोशल मीडियावरती (Social Media) तसेच सेनापती बापट रोडवर (SB Road Pune) घडला आहे.

याबाबत 25 वर्षीय तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) शुक्रवारी (दि.5) फिर्याद दिली आहे. यावरुन रोहित नायक उर्फ तित्रे Rohit Nayak alias Titre (वय-27 रा. मु.पो. मैंदना, ता. साक्री, जि. धुळे) याच्यावर आयपीसी 354, 354(ड), 506 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहे.
आरोपीने तरुणीचा इन्स्टाग्रमावर फोटो लावून अश्लील नावाने बनावट अकाउंट तयार केले. त्यानंतर तरुणीच्या मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.
तर दुसऱ्या एका मैत्रिणीला तिच्या व्हॉट्सअॅपवर तरुणीचा चेहरा असलेला मॉर्फ केलेला न्युड फोटो पाठवला.
रोहित याने पीडित तरुणी काम करत असलेल्या ठिकाणचा संपर्क क्रमांक शोधून तिच्या मैत्रिणींना फोन करुन शिवीगाळ केली.

फिर्यादी तरुणी ती राहत असलेल्या परिसरातील दुकानात सामान आणण्यासाठी गेली असता आरोपीने तिचा पाठलाग केला. तिचा हात पकडून बोलायचे असल्याचे म्हणाला. मात्र तरुणीने त्याच्यासोबत बोलण्यास नकार दिला.
तरुणी तेथून जात असताना आरोपीने तुझे लग्न होऊ देणार नाही,
लग्न ठरले किंवा झाले तर आठ दिवसात सर्वांना फोटो पाठवून तुझे लग्न मोडेन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी (Ajay Kulkarni PI) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Praful Patel | प्रफुल्ल पटेलांची 840 कोटींची केस सीबीआयने बंद केली,
आता काहीही बोलू शकतो असं त्यांना वाटतंय : रोहित पवार

Pune Police News | पुणे: पोलिस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

Total
0
Shares
Related Posts
Pune PMC News | Katraj Kondhwa road work to be completed by March 2026 by acquiring land as per special law; Decision taken in meeting with District Collector - Information from Municipal Commissioner Naval Kishore Ram

Pune PMC News | विशेष कायद्यानुसार भूसंपादन करून कात्रज कोंढवा रस्त्याचे काम मार्च 2026 अखेर पूर्ण करणार; जिल्हाधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत निर्णय – महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती