Pune Crime News | पुणे : सावकाराच्या त्रासाला कंटाळून हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | व्याजाने पैसे काढून सुरु केलेल्या हॉटेलमध्ये 50 टक्के भागिदारी देण्यासाठी तगादा लावून त्रास दिला. तसेच व्याज घेऊन परस्पर हॉटेलमधील सामानाची विक्री करुन राहत्या घराची विक्री करण्याची धमकी खासगी सावकाराने दिली. सावकाराच्या त्रासाला वैतागून व्यावसायिकाने राहत्या घरी आत्महत्या केली (Suicide Case). हा प्रकार सप्टेंबर 2022 ते सोमवार (दि.13) या कालावधीत घडला आहे.

शिवराज विजयकुमार वडलाकोंडा (रा. महात्मा पुळे पेठ पुणे) असे आत्महत्या केलेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी रोहित सुभाष भोंडे Rohit Subhash Bhonde (रा. एच.पी. लोहियानगर, पुणे) याच्यावर आयपीसी 306 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत स्नेहल शिवराज वडलाकोंडा यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती शिवराज यांनी आरोपी रोहित भोंडे याच्याकडून सप्टेंबर 2022 मध्ये 5 लाख रुपये व्याजाने घेऊन खराडी येथे ‘द इंडीगो’ नावाचे हॉटेल सुरु केले होते. फिर्य़ादी यांच्या पतीने आरोपीकडून घेतलेल्या पैशांचे व्याज वेळोवेळी दिले. मात्र, रोहित भोंडे याने शिवराज यांच्याकडे हॉटेलमध्ये भागीदार करून दरमहिना 50 टक्के रक्कम देण्यासाठी तगादा लावला होता. फिर्यादी यांच्या पतीने 50 टक्के देण्याबाबत विचार करण्यासाठी मुदत मागितली होती. त्या मुदतीत आरोपीने फिर्यादी यांच्या पतीला काहीही कल्पना न देता परस्पर हॉटेलच्या सेटअपची विक्री केली.

सेटअपची विक्री करुन आलेली रक्कम फिर्यादी यांच्या पतीला दिली नाही.
तसेच शिवराज यांच्याकडे 5 लाख रुपयांची सतत मागणी करुन त्रास दिला.
रोहित याने शिवराज याच्या आईच्या नावावर असलेल्या घराची कागदपत्र तयार करुन त्याची विक्री करण्याची धमकी दिली.
त्याने फिर्यादी यांच्या सासूला आणि पतीला मानसिक त्रास दिला.
सततच्या त्रासाला वैतागून फिर्यादी यांचे पती शिवराज वडलाकोंडा यांनी सोमवारी (दि.13) आत्महत्या केली.
आतेमहत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रोहित भोंडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तापास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai North Lok Sabha | उत्तर मुंबई मतदारसंघात मराठी-अमराठी हे प्रचारातील मुद्दे गोयल यांच्यासाठी त्रासदायक

Swargate Pune Crime news | खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला स्वारगेट पोलिसांकडून अटक

Amit Shah | अमित शहांचा मोठा दावा, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले’ (Video)