Pune Crime News | पुणे : जामीनावर सुटताच तरुणीच्या दुचाकीला ‘जीपीएस’ लावून पाठलाग, तरुणावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बलात्कार व आठ लाखांचे दागिने घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीने कारागृहातून जामीनावर बाहेर आल्यानंतर पीडित तरुणीच्या नकळत तिच्या दुचाकीला ‘जीपीएस’ यंत्र बसवून पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ऑगस्ट 2023 ते 26 जानेवारी या कालावधीत घडला आहे.(Pune Crime News)

याप्रकरणी 23 वर्षीय पीडित तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) शनिवारी (दि.17) फिर्याद दिली आहे. यावरुन लखन माहदेव भिसे (वय-25 रा. मु.पो. पिंपळी ता. बारामती) याच्यावर आयपीसी 354(ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित तरुणी एका खासगी कंपनीत नोकरी करते. आरोपी आणि तरुणीची गेल्यावर्षी विवाहनोंदणी संकेतस्थळावरुन ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. लखन याने तिला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आर्थिक अडचण असल्याचे सांगून लखन याने तिच्याकडून आठ लाख तीन हजार रुपयांचे दागिने घेतले. तरुणीने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ केली. तसेच दागिने परत न करता फसवणूक केली.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
यावरुन खडक पोलिसांनी लखन भिसे याच्याविरोधात फसवणूक, बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक केली होती. या प्रकरणात तो कारागृहातून नुकताच जामीनावर बाहेर आला आहे. त्याने पुन्हा तरुणीचा पाठलाग सुरु केला. लखन भिसे याने तरुणीवर पाळत ठेवण्यासाठी तिच्या नकळत दुचाकीला जीपीएस यंत्र बसवले.

आरोपीने जीपीएसच्या माध्यमातून तरुणीचा पाठलाग सुरु केला.
हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेत आरोपी लखन याच्या विरोधात तक्रार दिली.
आरोपीने तरुणीच्या दुचाकीला लावलेले जीपीएस यंत्र काढून टाकले असून ते तपासणीसाठी पाठवले आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती भोरड करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune CP Amitesh Kumar | पोलीस आयुक्त अमितेश कुमार अ‍ॅक्शन मोडवर! पब, बार, रेस्टो बार, रूफ टॉप हॉटेल, क्लब आणि हुक्का पार्लर संदर्भात पुणे पोलिसांचा मोठा निर्णय (Video)

Pune Crime Branch | पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, साडेतीन कोटी रुपयांचे एम.डी जप्त (Video)

Namo Chashak 2024 In Pune | नमो चषक जिल्हास्तरीय शिवकालीन युद्धकला (सिलंबम) स्पर्धा संपन्न

50 लाखांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण; पोलिसांनी केली सुखरूप सुटका