Pune Crime News | वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देवून 30 लाखांची खंडणी मागणार्‍याला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

पुणे : Pune Crime News | मनसे नेते वसंत मोरे (MNS Leader Vasant More) यांच्या मुलाचे बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार करुन ३० लाखांची खंडणी मागणार्‍यांनी एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडेही खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, याप्रकरणी रुपेश मोरे (Rupesh Vasant More) यांना कॉल करणार्‍या अब्दुल खालीद अब्दुल रौफ सय्यद (३२, रा. बाला कम्पाउन्ड, ४/१०, निजामपुरा, घर नं ११/१, नुरशहा मशिदीजवळ दांडेकरवाडी, भिवंडी, ठाणे, मुळगाव आजमगड, सराईबीर, उत्तरप्रदेश) याला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) भिवंडी येथून अटक केली आहे. (Pune Crime News)

खंडणी मागितल्याप्रकरणी एका प्रसिध्द बांधकाम व्यावसायिकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ७७/२३) दिली आहे. हा प्रकार ३ मार्च रोजी रात्री ९ ते ७ मार्च रोजी साडेअकरा वाजेपर्यंत घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी मुस्कान शेख, अल्फिया शेख, कुब्रा, इम्तेज शेख या नावाचा वापर करुन फोन कॉल, व्हॉटसअ‍ॅप कॉल, व्हिडिओ कॉल केला. फिर्यादीचे मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या ४० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तसेच हे पैसे इऑन आय टी पार्कचे समोर उभी असलेल्या इनोव्हा गाडीत ठेवण्यास सांगितले. अनुज गोयल यांनी याबात खंडणी विरोधी पथकाकडे (Anti Extortion Cell Pune तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीखक प्रताप मानकर (Sr PI Pratap Mankar) तपास करत आहे.

अशाच प्रकारे वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे यांना मागील काही दिवसांपासून फोन येत होते.
रुपेश यांचा विवाह एका मुलीसोबत झाल्याच्या नोंदणी प्रमाणपत्राचे छायाचित्र त्यांच्या व्हॉटसअ‍ॅपवर पाठविले होते.
त्यांनाही इऑन आय टी पार्क येथे उभी असलेल्या गाडीत २० लाख रुपये ठेवण्यास सांगितले होते.
त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी भिवंडी येथून अब्दुल खालीद अब्दुल रौफ सय्यद
(३२, रा. बाला कम्पाउन्ड, ४/१०, निजामपुरा, घर नं ११/१, नुरशहा मशिदीजवळ दांडेकरवाडी, भिवंडी, ठाणे,
मुळगाव आजमगड, सराईबीर, उत्तरप्रदेश) याला अटक केली आहे. त्याच्याविरूध्द एकुण 7 गुन्हे दाखल आहेत.

Web Title :  Pune Crime News | Pune Bharti Vidyapeeth police arrested the person who threatened Vasant More’s son and demanded an extortion of 30 lakhs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | उद्धव ठाकरेंच्या सभेला तुम्ही गर्दी जमवली का? अजित पवारांचं मिश्किल उत्तर म्हणाले-‘आमचाच माजी आमदार फुटला, आम्ही कशाला…’

Pune News | मित्रांसोबत धुलिवंदन खेळून रंग धुण्यासाठी नदीवर गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू, मावळातील घटना

Gadchiroli Crime News | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या भावावर FIR, जाणून घ्या प्रकरण