Pune Crime News | गुन्हे शाखेकडून तडीपार गुंड शफ्या खानला येरवडा गावठाण परिसरातून अटक; शफिकवर 13 गंभीर गुन्ह्यांची नोंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तब्बल 13 गुन्हे दाखल असलेल्या तडीपार गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट-4 च्या पथकानं येरवडा गावठाण (Yerawada Gaothan) परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून कोयता हस्तगत करण्यात आला आहे. तडीपार काळात देखील तो शहरात फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

शफिक ऊर्फ शफ्या बशीर खान असे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे. शहर पोलिसांनी गुंडांवर कारवाई करुन अनेकांना तडीपार केले आहे. असे असले तरी हे गुन्हेगार पुन्हा शहरात येऊन गुन्हे करीत असल्याचे आढळून आले आहे. अशा गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे, हवालदार राजेश शेख, नागेशसिंग कुंवर, कौस्तुभ जाधव यांना माहिती मिळाली की, शफिक खान हा तडीपार असतानाही येरवडा गावठाणात आला आहे. या माहितीवरुन पोलिसांनी येरवडा गावठाण Yerawada Gaothan येथे शोध घेऊन त्याला पकडले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी कोयता आढळून आला. शफिक ऊर्फ शफ्या बशीर खान (रा. येरवडा गावठाण) याच्याविरुद्ध खुन, अमली पदार्थ बाळगणे याच्यासह 13 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहा पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे, पो.हवा राजस शेख, नागेशसिंग कुंवर, पो.ना. कौस्तुभ जाधव अमंलदार रमेश राठोड यांच्या पथकाने केलेली आहे.

हे देखील वाचा

आमची वाघाशी दुश्मनी कधीच नव्हती, दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान (व्हिडीओ)

Pune Crime News : कोंढव्यात भाजी विक्रेत्याच्या गालावर चाकूने वार

Aurangabad News | औरंगाबादमध्ये वीज कोसळून युवतीचा दुर्देवी मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

Pimpri News | तरुणाविषयी खोटी माहिती सांगितल्याने लग्नासाठी ठेवले ‘झुलवत’; केली आत्महत्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Wab Title : Pune Crime News | Pune Crime Branch arrests criminal Shafiq alias Shafia Bashir Khan from Yerawada Gaothan area