Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – गुंतवणुकीची पॉलिसी नसताना गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिषाने पाऊण कोटींची फसवणूक

पुणे : Pune Crime News | आरलँड यांचे ट्रिनिटी कम्युनिकेशन कंपनीत (Trinity Communication Company) गुंतवणुक (Investment) केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांची पाऊण कोटी रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी अमित कांबळे (वय ४२, रा. आंबेगाव पठार) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये
(Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २४३/२३) दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी आनंद विजय पाटोळे (Anand Vijay Patole), संतोष रुडाल्फ आरलंड (Santosh Rudolph Arland), सुष्मिता संतोष आरलंड-मिरजकर (Sushmita Santosh Arland-Mirajkar) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार, आरलंड यांच्या ट्रिनिटी कम्युनिकेशन या कंपनीची कोणतीही
गुंतवणुकीची पॉलिसी (Investment Policy) नाही.
असे असताना फिर्यादी यांच्या ओळखीचे आनंद पाटोळे यांनी कंपनीची माहिती सांगून या कंपनीमध्ये गुंतवणुक
केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले.
संतोष आरलंड व सुष्मिता आरलंड यांनी फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळेल,
असे आश्वासन दिले. त्यानुसार फिर्यादी यांनी २४ लाख रुपयांची गुंतवणुक डिसेंबर २०२१ मध्ये केली.
त्यापैकी १६ लाख ९५ हजार रुपये परत न करता त्यांची फसवणूक (Fraud Case) केली.
तसेच अमोल जागडे यांची ४३ लाख, उदय पाटील यांची ११ लाख व प्रशांत वनमाळी यांची ४ लाख रुपयांची
फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक कर्चे (PSI Karche) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : Bharti Vidyapeeth Police Station – Fraud of crores with the lure of excess return on investment without an investment policy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सिंहगड रोड पोलिस स्टेशन – वाईन शॉपचालकाला लुटण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार; नागरिक जमा झाल्याने चोरटे पळाले (Video)

Bharatiya Vidya Bhavan-Infosys Foundation | भारतीय विद्या भवनमध्ये 27 एप्रिल रोजी ‘लक्ष्य’ नृत्य कार्यक्रम

Get Together Marathi Film | “गेट टूगेदर’ चित्रपटातील “आभास की भास” या रोमँटिक गाण्याला जावेद अली, प्रियांका बर्वे यांचा स्वरसाज (Video)