Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पार्क पोलिस स्टेशन – 22 वर्षाच्या तरुणीला नेले दिल्लीला पळवून; प्रियकराचे अगोदरच लग्न झाल्याचे उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | प्रेमसंबंधात (Love Affair) लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून एका २२ वर्षाच्या तरुणीला दिल्लीला पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. तेथे गेल्यावर आपण प्रेम करीत असलेल्या तरुणाचे अगोदरच लग्न झाले असल्याचे तिला आढळून आले. (Pune Crime News)

याप्रकरणी सैफ (रा. येरवडा) असे त्याचे नाव असून चंदननगर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २३ वर्षाच्या तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २५५/२३) दिली आहे. हा प्रकार वडगाव शेरी (Vadgaon Sheri pune) येथे २९ मे रोजी घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कार्यालयात एका २२ वर्षाची तरुणी काम करत
असून वडगाव शेरी येथील मुलीच्या हॉस्टेलवर राहते. सैफ असे नाव असलेल्या तरुणाबरोबर तिचे प्रेमसंबंध होते.
त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिला २९ मे रोजी पळवून नेले. या तरुणीने आपल्या मैत्रिणीला फोन करुन सांगितले की,
सैफ याचे लग्न यापूर्वीच झाले असून मी घरी येत आहे. त्यानंतर ती अद्याप घरी आली नाही.
५ जून रोजी या तरुणीने आपल्या मैत्रिणीला फोन करुन सांगितले की, सैफ ने तिच्या डोळ्याला पट्टी बांधून
अनोळखी ठिकाणी आणले आहे. तेथे बरेच लोक आहेत. मी तुम्हाला गुपचुप लोकेशन पाठवत आहे.
त्यानंतर तिने लोकेशन पाठविल. ते दिल्लीतील नोयडा (Noida Delhi) येथील असल्याचे आढळून आले.
हा प्रकार समजल्यावर या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक पालवे (PSI Palve) तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Pune Crime News : Chandannagar Park Police Station – 22-year-old girl kidnapped to Delhi; It is revealed that the lover is already married

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | काय आहेत आजचे पुण्यातील सोन्या-चांदीचे दर? जाणून घ्या

Petrol Diesel Price Today | सर्वसामान्यांसाठी दिलासा! पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता; जाणून घ्या आजचा दर

Maharashtra Political Crisis | विधानसभा अध्यक्षांचे सूचक विधान; म्हणाले – ‘लवकरच क्रांतिकारक निर्णय घेणार’