Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – आरबीआय बँकेत नोकरीच्या आमिषाने ३० लाखांची फसवणूक

पुणे : Pune Crime News | बेलापूर येथील आरबीआय बँकेत (RBI Bank) नोकरी लावण्याच्या आमिषाने ३८ लाख ५० हजार रुपये घेऊन फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी वडगाव शेरी येथील एका ५२ वर्षाच्या नागरिकाने चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६०/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सदानंद बाळकृष्ण भोसले Sadanand Balkrishna Bhosale (वय ६२, रा. नवी मुंबई) आणि संभाजी विजय पाटील Sambhaji Vijay Patil (वय ४१, रा. नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पुणे व नवी मुंबईतील बेलापूर येथे फेब्रुवारी २०२२ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांचे मुलगा व मुलीस आरबीआय बँक बेलापूरमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखविले.
त्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून वेळोवेळी त्यांच्याकडून ३८ लाख ५० हजार रुपये घेतले.
त्यानंतरही त्यांच्या मुलगा व मुलीला नोकरीला लावले नाही.
त्यांनी पैसे परत मागितले असता ते परत न केल्याने शेवटी आपली फसवणुक (Fraud Case) केल्याचे
लक्षात आल्यावर आता त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक जानकर तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Pune Crime News : Chandannagar Police Station – RBI Bank fraud of Rs 30 lakhs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Non-Creamy Layer Certificate | खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे-पिंपरी क्राईम न्यूज : पिंपरी पोलिस स्टेशन – विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या नावाने बनावट सर्टिफिकेट तयार करुन संस्थेच्या बदनामीचा प्रयत्न

Benefits of Pomegranate | ’डाळिंब’ आरोग्यासाठी ब्रम्हास्त्र, रोज करा सेवन; हृदय मधुमेह आणि सूजसंबंधी…

Pune PMC Property Tax | पुणे महानगरपालिका : अखेर मिळकत करात 40 टक्के सूट देण्याचा निर्णय ! 1 मे पासून नवीन बिलांचे वाटप, 30 जूनपर्यंत बिल भरणार्‍यांना सवलत