Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – पांडवनगरमध्ये गुंडांचा राडा; टोळीच्या वर्चस्वातून तरुणावर जीवघेणा हल्ला करुन 4 चारचाकी, 14 दुचाकींची तोडफोड

पुणे : Pune Crime News | दोन टोळ्यांमधील वर्चस्वातून पांडवनगरमधील (Pandhav Nagar) पीएमसी कॉलनीत (PMC Colony) गुंडांच्या एका टोळीने धुडगुस घातला. तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. तसेच तेथे पार्क केलेल्या 4 चारचाकी, 14 दुचाकी आणि एक तीनचाकी गाड्यांची तोडफोड केली. (Pune Crime News)

याप्रकरणी सोनु सुनिल अवघडे Sonu Sunil Awaghade (वय २५, रा. पीएमसी कॉलनी, पांडवनगर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २७३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रुपेश विटकर (Rupesh Vitkar) आणि इस्माईल शेख (Ismail Shaikh) यांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार चपत्या विटकर, लवकुश चव्हाण, सुरज जाधव, अक्षय जाधव, इसान पठाण, बबलु देवकुळे, चैतन्य पवार, चिम्या व इतर १८ ते २० जणांवर खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजता पांडवनगरमध्ये घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी रुपेश विटकर, चपत्या विटकर पांडवनगरमध्ये
एका परिसरात राहतात. फिर्यादी रहात असलेल्या सोसायटीत आरोपी हातात लाकडी दांडके घेऊन आले.
त्यांनी खाली पार्क केलेल्या दुचाकी व चार चाकी गाड्यांची तोडफोड केली.
रुपेश विटकर याने फिर्यादीला “माझी गाडी कोणी फोडली़ कोण भाई झाला आहे या भागामध्ये़ अजय व विजय
हे दोनच भाई आहेत. त्यांना खुन्नस देतोस काय” असे म्हणून चपत्या ने फिर्यादीला दांडक्याने मारहाण केली.
रुपेश विटकर याने लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या डोक्यात वार केला.
त्याने तो वार चुकविल्याने खांद्याला वार लागून तो जखमी झाला.
आरोपींनी ४ चारचाकी, १४ दुचाकी व एक तीन चाकी गाड्यांची तोडफोड करुन नुकसान केले.
तसेच परिसरात आरडाओरडा करुन दहशत निर्माण केली. पोलीस उपनिरीक्षक चाळके तपास करीत आहेत.

Web Title :-   Pune Crime News | Pune Crime News : Chatushringi Police Station – Gangsters’ rampage in Pandavnagar; 4 four-wheelers, 14 two-wheelers vandalized by gang dominance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil |डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावे – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

CM Eknath Shinde On Kolhapur | कोल्हापुरातील रस्त्यांसाठी 100 कोटींचा निधी, उच्च न्यायालयाच्या सर्कीट बेंचसाठी पाठपुरावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे