Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : डेक्कन पोलिस स्टेशन – क्रिप्टो करन्सीतील परतावा न मिळाल्याने तरुणाचे अपहरण करुन ठेवले डांबून; जबरदस्तीने खरेदीखत करुन जीवे मारण्याची दिली धमकी

पुणे : Pune Crime News | जर्मनीतील कंपनीमधील क्रिप्टो करन्सीमध्ये (Cryptocurrency) केलेल्या गुंतवणुकीचा (Investments) परतावा मिळत नसल्याने त्याला कारणीभूत असल्याचे समजून तरुणाचे डेक्कन जिमखाना येथील हॉटेलमधून अपहरण (Kidnapping) केले. फलटण (Phaltan) येथील हॉटेलमध्ये रात्रभर डांबून ठेवले. त्यानंतर फलटण येथील फ्लॅटचे जबरदस्तीने खरेदीखत करुन घेण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी समीर दस्तगीर काझी (वय ४०, रा. श्रीनाथ सोसायटी, थेरगाव, चिंचवड – Thergaon, Chinchwad) यांनी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये (Deccan Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७३/२३) दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अजिंक्य प्रताप कदम (Ajinkya Pratap Kadam), वैभव भारत कदम (Vaibhav Bharat Kadam), श्रेयस कदम (Shreyas Kadam Phaltan), राहुल निंबाळकर (Rahul Nimbalkar Phaltan), मनोज भगत (Manoj Bhagat Phaltan), अभिमन्यु घनवट Abhimanyu Ghanwat Phaltan (सर्व रा. फलटण, जि. सातारा – Satara) व त्यांच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जंगली महाराज रोडवरील हॉटेल शुभम (Shubham Hotel, Jungli Maharaj Road) येथे तसेच फलटण येथे २६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा ते २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे परिचयाचे आहेत.
फिर्यादी यांच्या सांगण्यावरुन आरोपींनी डिजिटल टेक्नॉलॉजी प्लॅटीन वर्ल्ड
Digital Technology Platinum World (जर्मनी – Germany) या कंपनीमध्ये क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुक
केली आहे. मागील ३ महिन्यांपासून कंपनीचे सिस्टीममध्ये अपडेट सुरु असल्यामुळे महिन्यांचा परतावा
क्रिप्टो कॉईन स्वरुपात अकाऊंटला जमा होत होता.
परंतु अपडेट सुरु असल्यामुळे भारतीय चलनात पैसे काढण्यास वेळ लागत होता.
या सर्वास समीर काझी हा कारणीभूत आहे, अशी आरोपींची समजूत झाली.
फिर्यादी हे हॉटेल शुभम येथे बसले असताना आरोपी तेथे आले.
त्यांनी फिर्यादीस चाकू लावून शिवीगाळ करत मारहाण (Beating) केली.
त्यांना जीवे ठार मारण्याची तसेच गावाकडील घर जाळण्याची धमकी दिली.

जर्मनीतील कंपनीत गुंतविलेल्या ६५ लाख रुपयांची मागणी केली.
त्यानंतर त्यांनी फोरच्युनर गाडीत जबरदस्तीने बसविले.
गाडी कोठे गेली हे समजू नये, यासाठी गाडीचे स्मार्ट कार्ड काढून ठेवले.
त्यांना फलटण येथील महाराजा हॉटेल (Maharaja Hotel, Phaltan) येथे नेले. रात्रभर डांबून ठेवले.
त्यानंतर फलटण येथील शेतातील अनोळख्या फार्म हाऊसवर नेले. तेथे फिर्यादी यांना चाकू लावून आम्ही सांगेल
तसे कर नाही तर बघ काय करतो,अशी धमकी दिली. रजिस्टार ऑफिसमध्ये घेऊन गेले.
फिर्यादी यांचे फलटणमधील लक्ष्मीनगरमधील फ्लॅट मनोज भगत याच्या नावावर जबरदस्तीने खरेदीखत करुन घेतले.
हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना सोडून दिले.
त्यानंतर पुण्यात आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक पठाण तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Pune Crime News : Deccan Police Station – Youth kidnapped and kept in Dambun for non-payment of cryptocurrency; Threatened to kill by forcibly buying fertilizer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On MSRTC Bus | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : एसटीचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प, मुंबई–ठाणे-पुणे अशा 100 शिवनेरी बसेस इलेक्ट्रिकवर धावणार

Balasaheb Thackeray Aapla Dawakhana | राज्यातील 317 तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” सुरू

CM Eknath Shinde On Marine Drive | मरीन ड्राईव्ह परिसरात पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा द्याव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे