Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : फरासखाना पोलिस स्टेशन – बुधवार पेठेत गंमत म्हणून आले अन् तिघांनी त्यांना मारहाण करून लुटले

पुणे : Pune Crime News | महाविद्यालयात शिकणारे दोघे मित्र मध्यरात्रीनंतर गंमत म्हणून वेश्या व्यवसायासाठी कुप्रसिद्ध असलेल्या बुधवार पेठेत (Budhwar Peth Pune) आले. तेव्हा तिघा जणांनी त्यांना मारहाण (Marhan) करुन त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने (Pune Robbery News) चोरुन नेले. (Pune Crime News)
याबाबत मांजरी येथील एका हॉस्टेलवर राहणार्या २० वर्षाच्या तरुणाने फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये (Faraskhana Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीवरील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार श्रीकृष्ण टॉकीजजवळील (Shri Krishna Theatre in Budhwar Peth) ढमढेरे गल्लीत (Dhamdhere Galli Pune) ३ मे रोजी पहाटे ३ वाजता घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून मांजरीतील (Manjri)
एका हॉस्टेलवर राहतो. मध्यरात्रीनंतर तो मित्राबरोबर कोथरुडला जेवायला जात होते.
त्यावेळी वाटेत सिटी पोस्टजवळ त्यांनी मोटारसायकल पार्क केली.
त्यानंतर उत्सुकतेपोटी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास श्रीकृष्ण टॉकीज समोरील ढमढेरे गल्लीत ते चालत गेले.
त्यावेळी तिघे जण त्यांच्याजवळ आले. त्यांच्यातील एकाने कॉल करण्यासाठी मोबाईल मागितला.
तेव्हा फिर्यादी यांनी रीचार्ज संपला आहे, असे सांगितले.
तेव्हा त्यांनी दोघांना मारहाण करुन त्यांच्याकडील ४० हजार रुपयांचे दोन मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन
ते मोटारसायकलवरुन पळून गेले. या सर्व प्रकारामुळे ते घाबरुन तेथून परत हॉस्टेलवर आले.
त्यानंतर या प्रकाराबाबत मित्रांनी धीर दिल्यानंतर त्यांनी फरासखाना पोलिसांकडे येऊन मंगळवारी तक्रार दिली
असून सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग (API Manoj Abhang) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : Faraskhana Police Station – Wednesday came to Peth for fun and three people beat them and robbed them
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update