Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडक पोलिस स्टेशन – एका थाळीवर एक थाळी फ्री ऑफरने महिलेला घातला २ लाखांचा गंडा

पुणे : Pune Crime News | फेसबुकवर एका थाळीवर एक थाळी फ्री ऑफर असल्याचे भासवून सायबर (Cyber Crime) चोरट्याने महिलेला तब्बल २ लाख रुपयांना गंडा (Cheating Case) घातला. विशेष म्हणजे हे सायबर चोरटे केरळचे असून त्यांनी पुण्यातील सुकांता येथील थाळी फ्री ऑफर देत होता.

याबाबत शुक्रवार पेठेतील एका ३८ वर्षाच्या महिलेने खडक पोलीस स्टेशनमध्ये (Khadak Police Station)
फिर्याद (गु. रजि. नं. १२७/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रकाश कुमार (रा. गार्डन बाजार, मुन्नर, केरळ)
व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २२ जुलै २०२२ रोजी घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आईचे फेसबुकवर सुकांता थाळी (Sukanta Thali) ची
एका थाळीवर एक थाळी फ्री, अशी ऑफर असल्याचे जाहिरात आली होती.
फिर्यादी यांच्या वडिलांनी त्यावरील मोबाईल नंबरवर फोन केला असताना त्यांनी बँक खात्याची माहिती घेऊन
त्यांच्या आय सी आय सी आय बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन १ लाख ९९ हजार रुपये काढून घेऊन फसवणूक (Fraud Case)
केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता यादव (PI Sangita Yadav) तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Pune Crime News : Khadak Police Station – One plate on one plate free offer cheated a woman of 2 lakhs

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | पुणे क्राईम ब्रँच न्यूज : दुकानातून सिगारेटचे बॉक्स चोरणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड; 4 लाखाचा मुद्देमाल जप्त

Whatsapp New Feature | Whatsapp चं नवं फीचर, एक अकाऊंट चार फोनमध्ये वापरता येणार