Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – चाकू दाखवून केला घाबरविण्याचा प्रयत्न; तोच चाकू खुपसून केला खून

पुणे : Pune Crime News | एकमेकांकडे पाहण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा त्याने दुसर्‍याला घाबरविण्यासाठी चाकू दाखविला. तेव्हा दुसर्‍याने त्याच्या हातातून चाकू हिसकावून तोच चाकू पोटात खूपसून त्याचा खून (Murder in Pune) केला. ही घटना कोंढव्यातील गरीब नवाज हॉस्पिटल (Garib Nawaz Hospital, Kondhwa) येथे मंगळवारी सकाळी ९ वाजता घडली. (Pune Crime News)

अहमद रजा खान Ahmad Raza Khan (वय २१, रा. युनिटी पार्क, कोंढवा) असे खून (Pune Murder News) झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ सलमान फारुख खान (वय २३, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४३३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सलिम इब्राहिम खान Salim Ibrahim Khan (वय ४९, रा. नवाजिश चौक, कोंढवा) याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत सलिमही जखमी झाला असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचार करण्यात येत आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा लहान भाऊ अहमद खान हा मंगळवारी
गरीब नवाज हॉस्पिटल येथून पायी जात होता.
त्यावेळी त्यांच्या ओळखीचा सलिम खान याने अहमद याच्याकडे पाहून शिवीगाळ केली.
त्याबाबत त्याने विचारणा केली असता त्यांच्यात वाद झाला.
तेव्हा अहमद याने त्याच्याकडील चाकू काढून सलिम याला घाबरविण्याचा प्रयत्न केला.
सलिम याने त्याच्याकडील चाकू हिसकावून घेत त्याच चाकूने अहमद याच्या पोटात सपासप वार केले.
गंभीर जखमी झालेल्या अहमद याचा मृत्यु झाला. सलिमही जखमी झाला. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे.
सहायक पोलीस निरीक्षक तोरगल तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Pune Crime News : Kondhwa Police Station – Attempted to intimidate by showing knife; Murdered by the same knife

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra IPS Transfer | राज्यातील 11 वरिष्ठ IPS पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या; IPS सुरेश मेकला, राजकुमार व्हटकर, कृष्ण प्रकाश, निखील गुप्ता, रविंद्र सिंघल, सुखविंदर सिंह यांचा समावेश

Police Suspended | मद्यधुंद अवस्थेत वाहतूक पोलिसाने उगारली भर रस्त्यात तलवार, परिसरात दहशत माजवणारा पोलीस तडकाफडकी निलंबित

Pune PMC News | नदीकाठ सुधार योजनेत केवळ १ हजार ७३४ बाभळी, सुबाभळीची झाडे काढण्यात येणार