Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोथरुड पोलिस स्टेशन – ज्येष्ठ कचरावेचक महिलेच्या अंगावर कुत्रा सोडून केली मारहाण; पैसे न देता कचरा उचलण्याची केली सक्ती

पुणे : Pune Crime News | पैसे न दिल्याने कचरा उचलला नाही. त्या रागातून एका कुटुंबाने ज्येष्ठ कचरा वेचक महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) केली. तिच्या अंगावर कुत्रा सोडल्याने तो चावला. जिन्यावरुन तिला खाली फरफटत ओढत खाली आणल्याने ही महिला गंभीर जखमी झाली. (Pune Crime News)

याबाबत लक्ष्मी दत्ता गायकवाड (वय ६५, रा. जय भवानीनगर, कोथरुड – Kothrud) यांनी कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १००/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुप्रिया संजय कांबळे (वय २३, रा. जय भवानी नगर, कोथरुड) व तिचा भाऊ व वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २२ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता घडली. (Pune Crime News)

कचरावेचक महिलांना कचरा उचलण्यासाठी दर महिना ७० रुपये देणे आवश्यक आहे.
कांबळे यांनी मागील तीन महिने पैसे दिले नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांचा कचरा उचलला नाही.
आरोपी सुप्रिया हिने फिर्यादी यांना कचरा का घेतला नाही, अशी विचारणा केली.
तेव्हा पैसे देण्यावरुन त्यांच्यात वाद झाला.
सुप्रिया हिने लाकडी दांडक्याने फिर्यादी यांच्या डोक्यात, पाठीवर मारुन जखमी केले. सुप्रिया हिच्या भावाने कुत्रा अंगावर सोडल्याने तो फिर्यादीला चावून त्या जखमी झाल्या.
सुप्रिया हिच्या वडिलांनी फिर्यादीस जिन्यावरुन खाली फरफटत ओढत आणले.
पोलीस हवालदार शिंदे तपास करत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Pune Crime News : Kothrud Police Station – A senior garbage collector was beaten up by a dog; Forced to pick up garbage without payment

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police Mega City |  महाराष्ट्र पोलीस मेगासिटी सह. गृहनिर्माण संस्थेचे काम रखडले, 7000 पोलीस कर्मचारी घराच्या प्रतिक्षेत (Video)

Dr. Nivedita Bhide | ‘गोष्टी, गोष्टी,पन्नास गोष्टी !’ पुस्तक संचाचे प्रकाशन – गोष्टींमुळे भाव जागरण व्हावे, दिशा मिळावी : डॉ. निवेदिता भिडे

CM Eknath Shinde | ‘झोळी लटकवून निघून जाशील…’, उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानांवरील टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले… (व्हिडिओ)

Vaikunth Smashan Bhoomi Pune | वैकुंठ स्मशानभूमी येथील वायू प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश