Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोथरुड पोलिस स्टेशन – नातेवाईकांच्या नावाने मिळविले फेरीवाला परवाने, एकावर FIR

पुणे : Pune Crime News | कैलास विठ्ठल भिंगारे याने रहिवाशांचे नावे स्वत:च्या रेशन कार्डवर (Ration Card) वाढवून त्यांच्या नावाने फेरीवाला परवाने मिळविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत महापालिका अधिकारी अतिक्रमण निरीक्षक महेश मारणे (PMCOfficer Mahesh Marne) यांनी कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये
(Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०४/२३) दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी कैलास विठ्ठल भिंगारे Kailas Vitthal Bhingare
(वय ५९, रा. रामबाग कॉलनी, पौड रोड, कोथरुड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालयातील (Kothrud Bavdhan Regional Office)
अतिक्रमण विभागात २०१४ ते ३१मार्च २०२३ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास भिंगारे याने स्वत:च्या
आर्थिक फायद्यासाठी त्यांचे नातेवाईक हे पुण्यात रहात नसताना स्वअधिकारात स्वत:चे नावे असलेल्या रेशन
कार्डमध्ये नातेवाईकांची नावे वाढविली. रेशन कार्डमध्ये फेरफार केला. ती शासकीय कागदपत्रे खरी असल्याचे भासविले. अर्जामध्ये अर्जदारांचे फोटो न लावता इतर व्यक्तींचे फोटो लावून खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले.
त्या आधारे फेरीवाला नावाचे परवाने प्राप्त केला. त्याचा वापर करुन स्वत:ला आर्थिक फायदा प्राप्त करुन परवाने
पुणे मनपाकडे (Pune PMC News) जमा केले आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक पांढरे तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Pune Crime News : Kothrud Police Station – Fairly encroachment inspectors obtained hawker licenses in the name of relatives

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | पुणे क्राईम ब्रँच न्यूज : दुकानातून सिगारेटचे बॉक्स चोरणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड; 4 लाखाचा मुद्देमाल जप्त

Whatsapp New Feature | Whatsapp चं नवं फीचर, एक अकाऊंट चार फोनमध्ये वापरता येणार