Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणीकंद पोलिस स्टेशन – भाड्याने जागा घेण्याचा बहाणा करुन बनावट खरेदीखत करुन ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

पुणे : Pune Crime News | हॉटेल व्यवसायासाठी (Hotel Business) भाड्याने जागा घेत असल्याचे सांगून भाडेकराराच्या ऐवजी खरेदी खतावर सह्या घेऊन पिंपरी सांडस येथील मोक्याची जागा बळकावून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी खंडेराव गेनबा भोरडे (वय ७४, रा. पिंपरी सांडस, अष्टापूर फाटा, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३४५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नितीन अंकुश मेमाणे Nitin Ankush Memane (वय ४२), आशा नितीन मेमाणे Asha Nitin Memane (वय ४०), आकाश संपत कोतवाल Aakash Sampat Kotwal (वय ३०), अनिकेत सुरेश कोतवाल (वय २९), संतोष उल्हास साळुंके Santosh Ulhas Salunke (वय ३२, सर्व रा. अष्टापूर, ता. हवेली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वयस्कर असून त्यांना डोळ्याने कमी दिसते.
त्यांची पिंपरी सांडस येथे रोड टच ११. ६० आर जागा आहे. त्यापैकी ५ आर क्षेत्र हॉटेल व्यावसायासाठी भाडेतत्वावर घेतो,
असे आरोपींनी फिर्यादीला भासविले. त्याबदल्यात दरमहा २५ हजार रुपये भाडे व ९ लाख रुपये डिपॉझिट देतो,
असे सांगितले. हा भाडेकरार नामा करण्यासाठी त्यांनी फिर्यादी यांना लोणी काळभोर येथील
दुय्यम निबंधक कार्यालयात (Sub Registrar Office, Loni Kalbhor) १५ फेबु्वारी २०२३ रोजी नेले.
प्रत्यक्षात भाडेकराराऐवजी त्यांच्या जागेचे खरेदीखत करुन त्यावर त्यांची सही घेऊन फसवणूक (Fraud Case) केली. हा प्रकार आता लक्षात आल्यावर त्यांनी फिर्यादी दिली असून सहायक पोलीस निरीक्षक गोडसे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station – Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा 

Pune NCP News | पुण्यातील राष्ट्रवादी भवनालाही फुटला हुंदका (Video)

PM Kisan-Pune News | पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातच उपलब्ध

Cm Eknath Shinde | राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश